सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ मलिकांना २ तासातच बसला दुसरा दणका; रमजान ईद तुरुंगातच!

Nawab Malik | ED | : आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering CaseSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च पाठोपाठ सत्र न्यायालयानेही दणका दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA न्यायालयाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ मेपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्या कारागृहातील मुक्कामात १४ दिवसांची वाढ झाली असून रमजान ईद तुरुंगातच साजरा होण्याची चिन्ह आहेत. याशिवाय न्यायालयात दाखल केलेल्या ५ हजार पानी आरोपपत्रावर कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून याची प्रत आरोपीला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान ईडीने अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे प्रकरण २२ वर्षांपूर्वीचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज शुक्रवारी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सुर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case
जाहीर खिल्ली आहे ही! मिटकरींविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यानंच थोपटले दंड

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरूध्द ही याचिका होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मलिका यांची बाजू मांडली. १९९३ मध्ये झालेल्या घटनेसाठी २०२२ मध्ये अटक कशी केली जाऊ शकते, असा दावा सिब्बल यांनी केला. पण न्यायाधीश सुर्यकांत यांनी संबंधित न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यास सांगत आम्ही या टप्प्यावर यात ढवळाढवळ करणार नाही, असं स्पष्ट केले. त्यामुळे इथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही.

दरम्यान, मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. २३ फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. तेव्हापासून म्हणजे तब्बल ५९ दिवसांपासून ते कोठडीमध्येच आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात पाच हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com