Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

मोठी बातमी : शिवसेनेत राष्ट्रीय पातळीवर फुट? शिंदेंच्या बैठकीला 'हे' 12 खासदार उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे (shivsena) 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतेपदी नियुक्ती केली आहे.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलीक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने, भावना गवळी यांचा समावेश आहे. हे खासदार मंगळवारी लोकसभा अध्यक्षांना वेगळा गट तयार करण्यासाठी पत्र देण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रतोद पदी भावना गवळी यांना कायम ठेवण्यात येणार आहे. तर राहुल शेवाळे यांची गटनेते पदी नियुक्त होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
आढळरावांचा शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’; हकालपट्टीच्या अपमानाचे उट्टे काढले!

शिवसेनेच्या खासदारांची बैठक दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या घरी सुरु आहे. त्या बैठकीला सात खासदारांची उपस्थिती असल्याची माहिती आहे. त्यामध्ये विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे, कलाबेन डेलकर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पक्षाची राष्ट्रीय कार्यकारीनीही जाहीर केली. त्यामध्ये रामदास कदम (Ramdas Kadam) आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ (Anandrao Aadsul) यांची नेते पदी नियुक्ती केली. तर आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड केली आहे. तर उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. जुनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली.

Eknath Shinde Latest Marathi News, Uddhav Thackeray Latest News
ठाकरेंनी केली कदम अन् अडसूळांची हकालपट्टी; शिंदेकडून उपनेते पद

शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत बंड केले. त्यानंतर त्यांना खासदार आणि माजी आमदार तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शिंदे यांनी थेट आज ठाकरेंना बाजूला ठेवत कार्यकारीनीच जाहीर केली आहे. या बैठकीला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in