Eknath Shinde यांचा भाजपलाच धक्का: १०० पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला

Eknath Shinde| बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदारांना गळाला लावले
Eknath Shinde & Devendra Fadanvis
Eknath Shinde & Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : बंडखोरी नंतर राज्यात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला (NCP) चांगलीच गळती लागली आहे. पण आता दहिसरमध्ये शिंदे गटाने थेट भाजपलाच धक्का दिला आहे. मुंबईतील 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला (BJP) रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत काल भाजपच्या 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. प्रकाश सुर्वे यांनी स्वतः या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत. सुर्वे यांच्या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 25 मधील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Eknath Shinde & Devendra Fadanvis
Jayant Patil : निवडणुका पुढे ढकलण्याचा शिंदे-फडणवीसांचा प्लॅन

शिवसेना-राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाने सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदारांना गळाला लावले. त्यानंतर हळूहळू राज्यभरातून वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकारही कोसळलं.

महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केलं. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण आता शिंदे गटाने याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही गळाला लावले आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in