ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात रामायण घडले ते उद्या अधिकृत आमदार होणार...

Shivsena | BJP | : प्रविण दरेकर, एकनाथ खडसे, भाई जगतापांची तोफ विधान परिषदेवर पुन्हा धडाडणार...
Ram Shinde | Pravin Darekar | Prasad Lad| Shrikant Bharatiy | uma khapre
Ram Shinde | Pravin Darekar | Prasad Lad| Shrikant Bharatiy | uma khapreSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या एक महिन्यात मोठी उलथापालथ झाली. आधी राज्यसभा, मग विधानपरिषद आणि अखेरीस एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) बंड या सगळ्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार जावून स्वतः शिंदे मुख्यमंत्रीपदी आले. मात्र या सगळ्यात लक्षवेधी घडामोड ठरली ती विधानपरिषदेची निवडणूक.

या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल २१ मत फुटली. यात शिवसेनेची ३, काँग्रेसची ७ आणि इतर आमदारांची ११ मत होती. ही २१ मत फुटल्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये कमालीची नाराजी असल्याचे समोर आले होते. याच निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. दरम्यान या निवडणुकीत निवडून आलेले १० आमदार आता उद्या शपथबद्ध होणार आहेत.

शुक्रवारी दुपारी १२ वाजता विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती सर्व आमदारांना शपथ देणार आहेत. यात भाजपकडून प्रविण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय हे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी आणि काँग्रेसचे भाई जगताप हे शपथ घेणार आहेत.

चंद्रकांत हंडोरेंचा झाला होता पराभव :

दरम्यान विधान परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या फेरीत २२ मत मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर भाई जगताप यांना दुसरा पसंती क्रम असल्याने मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com