मुंबई युवक काॅंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? सिद्दीकी आणि ठाकूर यांच्यात रस्सीखेच - Zeeshan Siddique and Thakur in race for the post Mumbai Youth congress president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

मुंबई युवक काॅंग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? सिद्दीकी आणि ठाकूर यांच्यात रस्सीखेच

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हे पद महत्वाचे ठरणार आहे. 

नवी दिल्ली : मुंबई युवक काॅंग्रेसचा (Mumbai Youth Congress) अध्यक्ष नेमण्यासाठीच्या हालचालींनी वेग घेतला असून या पदासाठीच्या मुलाखती आज दिल्लीत पार पडल्या. आमदार जिशान  सिद्दीकी (Zeeshan Siddique)  आणि सूरजसिंह ठाकूर (Surajsinha Thakur)  या दोघांमध्ये या पदासाठी चुरस आहे.

या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. वांद्रे पूर्वचे आमदार असलेले सिद्दीकी आणि एनएसयूआयचे  पदाधिकारी असलेल्या दोघांत सूरजसिंह ठाकूर दोघेही आमनेसामने उभे होते. सिद्दीकी  यांना सर्वाधिक  ८० हजार तर  सूरज सिंह ठाकूर ला ७४ हजार  मते  मिळाली. संघटनेच्या नियमानुसार सर्वाधिक मते मिळविलेल्यांच्या मुलाखती घेऊन नंतर त्यांची नियुक्ती केली जाते.

वाचा या बातम्या : मुंडे समर्थक आक्रमक, 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

या साठी दोन्ही युवा नेत्यांनी दिल्लीत ठाण  मांडले आहे. सिद्दीकी हे मुंबई  काँग्रेसचे अध्यक्ष  भाई जगताप यांचे विरोधक माने जातात. जगताप यांच्या विरोधात थेट  सोनिया गांधी आणि राहुल  गांधी यांना पत्र सिद्दीकी यांनी पत्र लिहले होते. तसेच शिवसेनेचे मंत्री आपल्या मतदारसंघात येऊन परस्पर कार्यक्रम घेतात, याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यातून महाविकास आघाडीत काॅंग्रेसचे आमदार नाराज असल्याचा संदेश गेला होता. या प्रकारावर नंतर सेनेने सारवासारव केली होती. 

राज्यात पुढील वर्षी महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे पद महत्वाचे ठरणार आहे. उमेदवार निवडणाऱ्या कार्ड कमिटित या अध्यक्षाचा समावेश असल्याने या पदाच्या मताला किंमत असते. त्यामुळे साहजिकच पक्षातील इतर नेतेही आपल्या गटातील अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख