मनसेला शिवसेनेचा धक्का: आदित्य शिरोडकरांनी बांधले शिवबंधन

राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य यांचा समावेश होता...
Aditya Shirodkar
Aditya Shirodkar

मुंबई : शिवसेनेने मनसेला मुंबईत जोरदार धक्का दिला असून 'मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar joins Shivsena) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.

आदित्य यांचे वडिल राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र होते. तसेच त्यांचे व्यावसायिक संबंधही होते. मित्राचा मुलगा या नात्याने आदित्य देखील राज यांच्या निकट होते. मात्र मनसे विद्यार्थी सेनेच्या कामावरून मनसेत त्यांच्याबद्दल नाराजी होती. परिणामी आदित्य हे देखील फारसे सक्रिय नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी अखेर मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य शिरोडकर जी यांचे शिवसेना परिवारात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे म्हणत आदित्य यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी शिरोडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने हा मनसेसाठी धक्का मानला जात आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिरोडकर यांच्यात गेल्या वर्षी वाद झाला होता. त्याची आठवण यानिमित्ताने अनेकांना आली. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये शिरोडकर यांच्याकडे उच्चशिक्षण विभागाची जबाबदारी होती. 

त्यांच्या शिवसेना प्रवेशाची मनसेतून पहिली प्रतिक्रिया मनसेेचे नेते अभिजित पानसे यांनी दिली असून `चला !!! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं ग्रहण सुटलं`, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com