song of IAS officer AbhishekSingh hits in social media as it crosses 2 crore views | Sarkarnama

IAS अधिकाऱ्याचे `दिले तोड के` गाणे सुपरहिट! बेवसिरीजमध्येही काम करणार

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 20 जुलै 2020

एखादा आयएएस अधिकारी व्यावसायिक फिल्म किंवा मालिकेत दिसण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील एका शाळेत दलित शिक्षकाला उठाबशा काढायला लावल्यामुळे चर्चेत आलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी अभिषेकसिंह सध्या वेगळ्याच कारणामुळे सोशल मिडियात हिट झाले आहेत. अभिषेकसिंह यांनी एका व्हिडीओ अल्बममध्ये भूमिका केली असून त्यांचे `दिल तोड के` हे गाणे दोन कोटी 80 लाख वेळा पाहिले गेले आहे. पाच दिवसांतच त्यांचे गाणे हिट झाले आहे. हे गाणे भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड  झाले. 

अभिषेकसिंह यांचे वडिलही आयपीएस अधिकारी होते.  अभिषेक हे गेल्या तीन वर्षांपासून चित्रपटांत काम करण्यासाठी मुंबईतील निर्मात्यांच्या घरचे उंबरठे झिजवत होते. त्यांना फेब्रुवारीत एक मोठी आॅफर आली आणि नेटफ्लिक्सवरील `दिल्ली क्राईम टू`मध्ये त्यांना काही दिवसांपूर्वी संधी मिळाली. लवकरच ही सिरीज नेटफ्किक्सवर दिसणार आहे. एखादा आयएएस अधिकारी व्यावसायिक फिल्म किंवा मालिकेत दिसण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. त्यांनी या आधी `चार पंद्रह` या शाॅर्टफिल्ममध्येही काम केले होते. 

`दिल तोड के` या गाण्यातील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. मनोज मुंतशिर यांचे हे गाणे बी. प्राकने गायले रोशाक कोहली यांनी संगीत दिले आहे. हे मूळ गाणे गुलशनकुमार यांच्या बेवफा सनम यांच्या 1995 मधील चित्रपटातील आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत गुलशनकुमार यांचा भाऊ भूषणकुमार हा होता. मूळचे गाणे उदित नारायण यांनी गायले होेते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख