संजय राऊतांनी शंभर जणांची यादी ईडीकडे द्यावी : देंवेंद्र फडणवीस यांचे आव्हान - sanjay raut should give list of hundred people to ed denvendra fadnaviss challenge | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊतांनी शंभर जणांची यादी ईडीकडे द्यावी : देंवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही. भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर आगपाखड करून आपल्याकडे भाजपच्या शंभर जणांची यादी असल्याचा कांगावा करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी ती यादी सक्त वसुली संचालनालयाकडे द्यावी. मी स्वत: कारवाई करायला भाग पाडेन, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ज्यांची कोणतीही चूक नाही. त्यांनी कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. वस्तुस्थितीपासून दूर पळण्यासाठी या विषयावरून खासदार राऊत यांनी कांगावा करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील घरी आज ईडीने छापे टाकून कारवाई केली आहे. याचे पडसाद तातडीने उमटले असून गैरप्रकारात सहभागी असलेल्या भाजपच्या शंभर लोकांची यादी आपल्याकडे असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी म्हटले होते. त्याला सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी उत्तर दिले. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते अग्रलेखातून टीका करीत आहेत. ते म्हणाले, राऊत यांनी केवळ कांगावा करू नये. शंभर जणांची यादी असल्यास त्यांनी ती ईडीकडे देण्याचे धाडस दाखवावे. वीज बिलासंदर्भात बोलताना त्यांनी पाच वर्षांचे नव्हे तर गेल्या वीस वर्षांतील कामाचे ऑडिट करा, असे आव्हान दिले. वीज मंडळाच्या ज्या काही सकारात्मक सुधारणा झाल्या. त्या सर्व सुधारणा आमच्या सरकारच्या काळात झाल्या, हे या सरकारने आणि टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

मुंबई महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नाही. भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्याबाबत जे काही बोलले त्याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे. त्यावरून कुणी राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जे पक्ष विसरतात त्यांची युती अनैसर्गिक आहे, असा टोला त्यांना महाविकास आघाडी सरकारला लावला.
(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख