''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा

ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा द्या
''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा
Sarkarnama Banner - 2021-07-30T124046.894.jpg

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकल सुरु करण्याबाबत काही दिवसापूर्वी पत्र लिहिलं होतं. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिला आहे.

आपल्या टि्वटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात की, ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा द्यावी.राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल.
 शिवसेनाशाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण 
“महाराष्ट्र सरकारनं निबंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरु करण्यासाठी आता तातडीनं पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरु करण्यासाठी आंदोलन सुरू करेल," असा इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं होतं.
धक्कादायक : माजी व्यवस्थापकाकडून बँक लुटण्याचा प्रयत्न
''लोकल सुरु करा नाही तर आंदोलन करू'' असा इशारा भाजपनं राज्य सरकारला दिला आहे. लोकल सुरु झाली नाही तर लोकलवरून राजकीय मंडळी भिडणार असं चित्र सध्या निर्माण झाले आहे. अनलॉकिंग करताना एकदम शिथीलता न देता हळू हळू निर्बंध उठवले जातील. येत्या काही दिवसांत मुंबई लोकल सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुणे : लाचखोर अन् कामचुकार अधिकाऱ्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो, पण एका महिला पोलिस Pune Police अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध हाँटेलची बिर्याणी Biryani मोफत हवी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले फोनवरील संभाषण सध्या खूप व्हायरल होत आहे. पुण्यातील पोलिस आयुक्त DCP असलेल्या या अधिकाऱ्यांच्या अशा कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार थेट पोलिस महासंचालकाकडे केली आहे. त्या कर्मचाऱ्याने याबाबतचे पत्र आणि ती मोफत बिर्याणीची मॅडमची फर्माईशची आँडिओ क्लिप audio clipपोलिस महासंचालकांना पाठविली आहे.  
Edited by : Mangesh Mahale 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in