''शाखाप्रमुख बनायचं की पक्षाचे काम करायचं ?" नार्वेकरांची पोस्ट व्हायरल

मिलिंद नार्वेकर यांनी टि्वटवरुन उद्धव ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-27T114918.764.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-27T114918.764.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांचा आज वाढदिवस. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. ''महाराष्ट्र शोकाकुल असताना हारतुरे नकोत,'' असे उध्दव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले आहे.  त्यांच्यासमवेत सावलीसारखे वावरणारे पूर्वीचे स्वीय सचिव आणि आता शिवसेना पक्ष सचिव झालेल्या मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांनी टि्वटवरुन उद्धव ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये नार्वेकर म्हणतात की, एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, "शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?" उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली.

''कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पुरामुळे अनेक मृत्यू झाले आहेत तर अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,'' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्यातील महापुराच्या आपत्तींमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ई-मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

पंडीत नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल नक्की काय म्हणाले? 
मुंबई : कारगिल संघर्षांतील योध्दयांचा सत्कार करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेहरू Pandit Nehru यांची शांतिदूत बनण्याची मनीषा देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरली असे मत मांडले. त्यावरून वाद पेटला आहे. कारगील विजय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी Bhagat Singh Koshyari बोलत होते. 

Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com