क्रिकेटपटू सुरेश रैना, गुरु रंधावा यांच्यावर गुन्हा दाखल - Offence Registered Agains Cricketer Suresh Raina | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

क्रिकेटपटू सुरेश रैना, गुरु रंधावा यांच्यावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

कोविडच्या नियमांचे उल्लंघन करुन सुरु असलेल्या पार्टीवर मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री छापा टाकला. त्यात अनेक सेलिब्रिटी मिळून आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरु रंधावा यांचा समावेश आहे.

मुंबई : कोविडच्या नियमांचे उल्लंघन करुन सुरु असलेल्या पार्टीवर मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री छापा टाकला. त्यात अनेक सेलिब्रिटी मिळून आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात क्रिकेटर सुरेश रैना, गायक गुरु रंधावा यांचा समावेश आहे.

जेडब्लू मॅरियेट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय पबवर ही मोठी कारवाई करण्यात आली. परवानगी दिल्याच्या वेळेपेक्षा अधिक वेळ हा पब सुरु होता. तसेच कोविडच्या नियमांचे उल्लंघन करुन तिथे पार्टी सुरु होती. छापा टाकल्यानंतर तिथे ३४ जण सापडले. त्यात सुरेश रैना, गुरु रंधावा, सुझेन रोशन खान यांचा समावेश होता. रॅपर बादशाह या पार्टीतून फरार झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. 

हाॅटेलच्या स्टाफ आणि ग्राहकांवर ही कारवाई करण्यात आली. दिल्ली आणि दुबईहून काल मुंबईत आलेले काही जण या पार्टीत सहभागी झाले होते. या सर्वांवर सीआरपीसी ४१ अ अंतर्गत नोटीस बजावून सोडण्यात आले. या सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ३४ पैकी १९ जण हे मुंबई बाहेरचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख