गृहमंत्र्यांनी १०० कोटी तुमच्यासमोर मागितले का? परमबीरसिंगांना न्यायालयाचा सवाल

गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंकडे दरमहा १०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारला आहे
Parmbir Singh - Anil Deshmukh
Parmbir Singh - Anil Deshmukh

मुंबई : गृहमंत्र्यांनी तुमच्या अधिकाऱ्यांकडे दरमहा १०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारला आहे. तुम्ही केलेले आरोप हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आहेत, असेही मत न्यायालयाने नोंदवले आहे. Did Home Minister Asked for Money in Front of You asks High Court to Parambir Singh

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. या याचिकेत परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे जमा करण्यासाठी टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. तसेच याचा तपास सीबीआयला देण्याची मागणी केली होती. तसेच देशमुखांच्या बंगल्यावरील सीसीटिव्ही तपासून त्यांना भेटायला कोण कोण येत होतं हे पहावे असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. 

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या PILवर हाय कोर्टात सुनावणी सुरू आहे. या याचिकेत परमबीर यांनी गृहमंञी यांच्यावर पैसे जमा करण्यासाठी टार्गेट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच याचा तपास सीबीआयला देण्याची मागणी केली होती. तसेच देशमुखांच्या बंगल्यावरील सीसीटिव्ही तपासून त्यांना भेटायला कोण कोण येत होतं.  असे आरोप केलं होते. 

परमबीर सिंह हे आता व्हिक्टीम कार्ड खेळू पाहत आहेत. ही याचिका दाखल करताना त्यांचा वैयक्तिक स्वार्थ स्पष्टपणे सिद्ध होतोय. याप्रकरणी जनहित याचिका दाखल होऊच शकत नाही. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी आपल्या बदलीला आव्हान देत रिट याचिका दाखल केली. मात्र हायकोर्टात येताना त्याची जनहित याचिका कशी झाली?असा सवाल महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यावेळी उपस्थित केला. Did Home Minister Asked for Money in Front of You asks High Court to Parambir Singh

तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला तोंडी माहिती दिली. एक पोलिस अधिकारी या नात्याने तुमचे वरिष्ठ काही गैर करत असतील तर तुम्ही त्यांच्या विरोधात पोलिस तक्रार का दाखल केली नाहीत, असा सवालही न्यायलयाने विचारला. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितलं, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, असेही न्यायालयाने याचिकाकर्ते परमबीर सिंग यांना सुनावले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com