विनायक शिंदे हा तर सचिन वाझेंचा कलेक्टर? - Arrested Constabel in Hiren case may be Recovery Man of Sachin Waze | Politics Marathi News - Sarkarnama

विनायक शिंदे हा तर सचिन वाझेंचा कलेक्टर?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला बडतर्फ काँन्स्टेबल विनायक शिंदे हा सचिन वाझे यांचा 'कलेक्टर' असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेकडे ३२ बार व क्लबच्या नावांची यादी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला बडतर्फ काँन्स्टेबल विनायक शिंदे हा सचिन वाझे यांचा 'कलेक्टर' असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेकडे ३२ बार व क्लबच्या नावांची यादी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदेकडील चौकशीतून मुंबई पोलिसांचे वसुलीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. (Arrested Constabel in Hiren case may be Recovery Man of Sachin Waze)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Waze)दरमहा १०० कोटींची वसुली करण्यास सांगितले होते असा खळबळजनक आरोप वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ माजला आहे. दुसरीकडे शिंदेकडे क्लब व बारची यादी सापडल्याचे सांगण्यात येत आहे.  

प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स (Reliance)उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ २५ फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आली होती. त्या गाडीत जिलेटीनच्या २५ कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन हे होते. त्यामुळे हिरेन यांचाच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसने विनायक शिंदे व नरेश धरे यांना अटक केली. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS)ने निलंबित पोलिस हवालदार विनायक शिंदे व बुकी नरेश धरे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानतर ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसटीएसकडून केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) तपास देण्याचे आदेश दिले आहेत. (Arrested Constabel in Hiren case may be Recovery Man of Sachin Waze)

दरम्यान, हिरेन हत्या प्रकरणाचा गुन्हा 'एनआयए' कडे न देण्याबाबत राज्यसरकारचा निर्णय झाल्याचे समजते. वेळ प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याच सरकारची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसची तपासाची गती पाहता, हा गुन्हा एनआयएकडे वर्ग केल्यास तपासाला खिळ बसण्याची शक्यता.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख