'शिंदे'शाहीला शिवसेनेकडून विधानसभेची ऑफर
मुंबई : प्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली असून आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी,आरपीआय आणि एमआयएम पक्ष ही शिंदे पिता-पुत्राला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून शिवसेनेने आपला मोर्चा कलाकारांकडे वळवला आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे आणि डॉ.उत्कर्ष शिंदे यांना शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.यासाठी उद्धव ठाकरे यांनी पिंपरी आणि मोहोळ या आरक्षित विधानसभा मतदार संघात तिकीट देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक झाली. आनंद शिंदे यांनी या बैठकीत आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केल्याने उद्धव यांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती ही मिळत आहे. तर उत्कर्ष शिंदे यांनी पुण्यातील 'पिंपरी' किंवा सोलापूरातील मोहोळ मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. 'शिंदे'शाही महाराष्ट्रात लोकप्रिय असल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.