संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना अद्याप अटक न झाल्याने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत:हून हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने भिडे यांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
संभाजी भिडेंविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी 

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना अद्याप अटक न झाल्याने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (ता. 25) सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वत:हून हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने भिडे यांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
 
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी भिडे यांच्यासह मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिडे आणि एकबोटे यांच्या अटकेसाठी राज्यभरात विविध आंबेडकरी पक्ष आणि संघटनांनी आंदोलने-मोर्चे काढले होते.

भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही विरोधकांनी कामकाज रोखून धरले होते. 

यानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली; मात्र भिडे यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सरकारच भिडे यांना पाठीशी घालून कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याबाबत ऍड. योगेश मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

उच्च न्यायालयाचे न्या. आर. एम. सावंत आणि न्या. रेवती ढेरे-मोहिते यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. 
सरकारकडून भिडे यांचा बचाव का केला जात आहे, या मुद्द्यावर युक्तिवाद केला जाणार आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डॉ. सुरेश माने यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com