मुंबईत प्रत्येक खड्डा भरण्यासाठी सरासरी 17 हजार 693 रुपये खर्च झाले ! 

 मुंबईत प्रत्येक खड्डा भरण्यासाठी सरासरी 17 हजार 693 रुपये खर्च झाले ! 

मुंबई- मुंबईकरांसाठी रस्त्यांवर अडचणी मुक्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नसल्याचा दावा बीएमसीने केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोणतेही विशेष बदल झाले नाहीत.

मात्र, मुंबई रस्त्यांवर पडलेला खड्डा जवळपास 90 टक्के भरल्याचा दावा बीएमसीने केला आहे. बीएमसीच्या दाव्यांनुसार, 10जून ते 1ऑगस्ट 2019 पर्यंत 2648 खड्ड्यांपैकी 2623 खड्डे भरले गेले आहेत, तर केवळ 441खड्डे शिल्लक आहेत. परंतु बीएमसीचा दावा चा पोल आरटीआयच्या माध्यमातून उघड झाले आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पासून मुंबई रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत मुंबई महानगरपालिकेकडे माहिती मागविली होती, या संदर्भात सहाय्यक अभियंता व माहिती अधिकारी श्री.य. प. जुन्नरकर यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिली आहे. 

प्राप्त माहितीनुसार 2013 ते 31 जुलै 2019 पर्यंत मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या एकूण 24146 ऑनलाइन तक्रारी आल्या आहेत. आणि एकूण 23388 खड्डे भरले आहेत. परंतु बीएमसीचा दावा आहे की10जून ते 1ऑगस्ट 2019 पर्यंत 2648 खड्ड्यांपैकी 2623 खड्डे भरले गेले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com