कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणार; रेल्वेच्या चाळीस फेऱ्यांत वाढ..

रेल्वे रुळावर पाणी साचणे असेल, जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था, रेल्वेस्थानकांवर एक्सलेटर,फूट ओव्हर ब्रिज या सगळ्या कामांवर विशेष लक्ष देऊन ती पूर्ण केली जातील.
कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणार; रेल्वेच्या चाळीस फेऱ्यांत वाढ..
Minister raosaheb danve news Delhi

दिल्ली ः सध्या असलेली पूर परिस्थीती, गणपती उत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणारे नागरिक, चाकरमाने यांना कुठल्याही प्रकराचा त्रास किंवा गैरसोय आम्ही होऊ देणार नाही. प्रत्येकाची काळजी केंद्र सरकार घेईल. कोकणात जाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त ४० फेऱ्या वाढवल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Will take care of everyone going to Konkan; Increase in forty rounds of train) आणखी सोळा फेऱ्या प्रवशांची मागणी, वेटींगलिस्ट पाहून वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

आगामी गणेशोत्सव आणि या सणासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या उपयायोजना रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. (Central Railway State Minister Raosaheb Danve, Dehli) दानवे म्हणाले, कोकणात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी आणि व्यवस्था केंद्राकडून केली जाणार आहे.
प्रवाशांची एकाचवेळी गर्दी होऊ नये यासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या ७२ अतिरिक्त फेऱ्यांची घोषणा १४ जुलै रोजी करण्यात आली होती.

सध्याची गरज लक्षात घेता त्यात आणखी ४० फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही कोकणी माणूस गणपती उत्सवापासून मुकणार नाही.  वेटिंग लिस्ट वाढली, तर परत आम्ही नवीन व्यवस्था करू. एवढेच नाही तर रेल्वे संदर्भात , मुंबई आणि महाराष्ट्राती जे काही प्रश्न, अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. सध्या या विषयी सखोल अभ्यास सुरू असल्याचेही दानवे यांनी सांगितले.

रेल्वे रुळावर पाणी साचणे असेल, जेष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था, रेल्वेस्थानकांवर एक्सलेटर, फूट ओव्हर ब्रिज या सगळ्या कामांवर विशेष लक्ष देऊन ती पूर्ण  केली जातील.  मुसळधार पावसामुळे लोणावळा ते खंडाळा इथला भोरघाट रेल्वे मार्गातील अडथळ्यामुळे भिवपुरी ते कर्जत इथल्या कसारा घाटातील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

या विषयावर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून याचा आढावा घेतला. तातडीने मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांना आणखी त्रास होणार नाही, यासाठी रेल्वेने कसारा, इगतपुरी आणि बदलापूर या स्थानकांवरून बसेसने अडकलेल्या प्रवाशांना आपल्या निर्धारित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केल्याचेही दानवे यांनी पत्रकारांना सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in