३० वर्षे भाजपने शिवसेनेचे काय केले? उद्धव ठाकरेंचा हल्ला..

ओबीसी डेटात ज्या चुका आहेत, त्या देवेंद्र फडणवीस यांना कुठून कळल्या. केंद्र सरकारने त्या राज्य शासनाला का कळवल्या नाहीत, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला आहे.
Devendra Fadanvis - Uddhav Thackeray.
Devendra Fadanvis - Uddhav Thackeray.

मुंबई : भाजपबद्दल पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी ३० वर्षे सेनेचा केवळ वापर केल्याची खंत व्यक्त केली. आमदारांना निलंबित करणे ही लोकशाहीची हत्या असेल, तर विरोधी नेत्यांची ईडी चौकशी करणे हा काय लोकशाहीला पांढरा रंग देत सफेद करणे आहे काय Is it to whitewash democracy by whitewashing असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

पावसाळी अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जीएसटी पोटी ३० हजार कोटींची थकबाकी केंद्राने दिली नसल्याचे पत्रकारांना सांगितले. ओबीसी विषयात केंद्र सरकार जी माहिती देत नाही, त्यावर टीका केल्याने भाजपला कसला राग आला, असा प्रश्न करीत बेंबीच्या देठापासून ओरडणे, माईक तोडणे हे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली. जनतेला न्याय देण्याच्या चर्चेत सहभागी न होऊन विरोधकांना मिळत तरी काय, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला आहे.

तर १८ आमदारांवर कारवाई ?
राज्यपाल कोशियारी यांनी १२ आमदारांच्या नेमणुकीचा प्रस्ताव रोखून धरल्याने १२ सदस्यांना निलंबित केले काय, या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार यांनी तेथे १२ जणांनी गोंधळ घातल्याने १२ जणांना निलंबित केले, १८ जण असते तर १८ जणांना निलंबित केले असते. बाळासाहेब थोरात, मी असे ज्येष्ठ सदस्य या सभागृहात होतो. मात्र कालच्या प्रमाणे गोंधळ पाहिला नव्हता. भास्कर जाधव यांनी अत्यंत संयमाने हा विषय हाताळला. ते माझ्यासारखे तापट असले तरी त्यांनी संयम गमावला नाही. हातापायी सुरू असताना ते शिवसैनिक असूनही शांत राहिले याचे कौतुक वाटते, असेही अजितदादा म्हणाले. 

हेही  वाचा : 

ओबीसी डेटात ज्या चुका आहेत, त्या देवेंद्र फडणवीस यांना कुठून कळल्या. केंद्र सरकारने त्या राज्य शासनाला का कळवल्या नाहीत, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्राला लसी मिळाल्या तर आम्हीही रात्रंदिवस लसीकरणाचा कार्यक्रम राबवू. याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com