वड्डेटीवार, भूजबळांना ओबीसी आरक्षणापेक्षा सत्तेचीच हाव..

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपने पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसने देखील आपल्या स्वार्थी राजकारणासाठी तत्वे बासनात गुंडाळून सिंह यांचे सरकार पाडले होते.
Bjp Leader Prasad Lad- Wadeetiwar-Bhujbal News Mumbai
Bjp Leader Prasad Lad- Wadeetiwar-Bhujbal News Mumbai

मुंबई ः ओबीसींसाठी मंडल आयोग आणणाऱ्या पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार, स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी पाडणारी काँग्रेस ओबीसींचे हक्क कधीही जपणार नाही, अशी टीका भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. (Vaddetiwar, Bhujbal wants more power than OBC reservation.) आरक्षणाशिवाय निवडणूका नाही, अशी भूमिका घेणाऱ्या वड्डेटीवार, भुजबळ यांना सत्तेची हाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ओबीसी आरक्षणावरून सध्या वाद पेटला असून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत. (Bjp State Deputey President Mla Prasad Lad)  जाळपोळ करून मंडल आयोगाला विरोध करणारा भाजप महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण प्रश्नावरून आंदोलन करत आहे, याचे आश्चर्य वाटते, अशी टीका आमदार रोहित पवार यांनीही नुकतीच केली होती. (Obc Reservation) या विषयावरून भाजपवर होणाऱ्या टीकेला लाड यांनी  प्रत्युत्तर दिले. 

मंडल आयोगाला भाजपने केव्हाही विरोध केला नव्हता. साऱ्या भारतीयांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या राममंदिर निर्मितीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा अडवल्याने हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपने पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसने देखील आपल्या स्वार्थी राजकारणासाठी तत्वे बासनात गुंडाळून सिंह यांचे सरकार पाडले होते.

व्ही.पी.सिंहाचे सरकार पाडणारी काॅंग्रेस स्वार्थी..

नोव्हेंबर १९९० मध्ये लोकसभेत त्यासाठी काँग्रेसने सिंह यांच्या विरोधात मतदान केले होते.  १९८० मध्ये इंदिराजींनी केलेल्या प्रयोगाची पुनरावृत्ती करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने ते गलिच्छ राजकारण केले होते. आज भाजपला विरोध करणारे अनेक मातब्बर नेते तेव्हा काँग्रेसमध्येच होते व त्या कृतीला त्यांचाही पाठिंबा होता. तेव्हाच्या त्या भूमिका सर्व संबंधितांनी आठवून आत्मपरिक्षण करावे, असा टोलाही लाड यांनी लगावला. 

ओबीसी आरक्षण किंवा बढत्यांमधले आरक्षण या दोनही विषयांचे काँग्रेस व राष्ट्रवादीला काहीही देणेघेणे नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशा गर्जना विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ यांनी केल्या होत्या. मात्र आता निवडणुका जाहीर झाल्या तरीही हे दोघे डिंक लावल्याप्रमाणे सत्तेला घट्ट चिकटून बसले आहेत. त्यांना ओबीसींच्या आरक्षणाऐवजी सत्तेची हाव महत्वाची आहे, ओबीसींच्या हक्कांसाठी फक्त घोषणाबाजी करणे एवढेच त्यांना येते.

वडेट्टीवार यांना तर अशा अटीतटीच्या प्रसंगातही ओबीसी आरक्षणाऐवजी हुकलेल्या महसूलमंत्रीपदची आठवण येत आहे. किंबहुना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांनी आता सत्तेसाठी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी बढत्यांमधील आरक्षणाबाबत उपसलेली लाकडी तलवारही आता म्यान केल्याची जळजळीत टीकाही लाड यांनी केली.  मात्र या सर्व समाजघटकांचा विकास फक्त भाजप करेल, असेही ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com