नारायण राणे अजित पवारांवर भडकले अन् म्हणाले... 

सुक्ष्म आणि लहान खात्याकडून आम्हाला काय पैसे मिळणार?, असं वक्तव्य अजित पवार यांनी गुरूवारी केलं होतं.
नारायण राणे अजित पवारांवर भडकले अन् म्हणाले... 
Union Minister Narayan Rane criticize Dy CM Ajit Pawar

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस आहे. सध्या त्यांची यात्रा कोकणात असून सकाळी त्यांनी कणकवली येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेवर जोरदार टीका केली. दिल्लीत मंत्री म्हणून काम करताना शिवसेनेसह कोणत्याही पक्षाचा नेता कामासाठी आल्यास नाही म्हणणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (Union Minister Narayan Rane criticize Dy CM Ajit Pawar)

सुक्ष्म आणि लहान खात्याकडून आम्हाला काय पैसे मिळणार?, असं वक्तव्य अजित पवार यांनी गुरूवारी केलं होतं. त्याबाबत राणे यांना विचारलं असता ते म्हणाले, अजित पवार यांना अज्ञान आहे, तुमच्या खात्याकडं आधी बघा. मी राष्ट्रवादीकडे वळलो नाही. एका रात्रीत उपमुख्यमंत्री पदी जाऊन केस काढून कशा घ्यायच्या ते त्याच्याकडून शिकावं, अशी टीका राणे यांनी केली आहे. 

यात्रेदरम्यान अपशकुन झाला, मांजर आडवी गेली असं सांगत राणे म्हणाले, अनिल परब स्वत:ला राष्ट्रपती, पंतप्रधान समजत होते. दम देत होते, अटक करा म्हणत होते. यात्रा जाऊ देणार नाही, म्हणत होते. कुठेही एकही माणूस दिसला नाही. खूप फुशारक्या मारत होते. पण पदं मिळत असल्यामुळं असं बोलावं लागतं. मी देशाचा जबाबदार मंत्री आहे, मला काम करायच आहे. अशा लोकांनी गप्प राहावं. काही लोक मला विचलित करू पाहत आहेत, पण मी तसं होऊ देणार नाही. 

महाराष्ट्राची काहीही कामं असतील तर कोणतीही जातपात, पक्ष या गोष्टी लक्षात न घेता काम करेन. सेना खासदार आले तरी त्यांना निधी देईल. पण निधी देऊन उद्योजक बनवणार आणि सांगणार भाजप कडे वळा. शिवसैनिक स्कीम घेऊन आला तर तो भारतीय नागरिक म्हणून मदत करेन, असेही राणे यांनी स्पष्ट केलं. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच बंद दाराआड चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. याविषयी बोलताना राणे म्हणाले, बंद दाराआड हा तुमचा शब्द आहे.  कोण कोणाला भेटलं यावर मला काही फरक पडत नाही. मला विनाकारण भडकवू नका. मी मवाळ नाही आणखी भडकेन, असं राणे यांनी फटकारलं. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in