सरनाईक यांची भूमिका स्वागतार्ह; उद्धव ठाकरेंनी युतीचा विचार करावा.. - Sarnaik's role is welcome; Uddhav Thackeray should think of an alliance. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

सरनाईक यांची भूमिका स्वागतार्ह; उद्धव ठाकरेंनी युतीचा विचार करावा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 जून 2021

काँग्रेस -राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता.

मुंबई  :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी, अशी  स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. (Sarnaik's role is welcome; Uddhav Thackeray should think of an alliance.) त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत.  दोन्ही कॉंग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. (Central State Minister Ramdas Athavle) महाराष्ट्राच्या हितासाठी व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी  शिवसेना भाजपने एकत्र यावे, असेही आठवले म्हणाले.

काँग्रेस आणी राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी, ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. (Sena-Bjpa Alliance) शिवसेना- भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही, अशी प्रताप सरनाईक यांची सूचना योग्य आहे. त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा.

त्यांनी यापूर्वी काँग्रेस -राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी, याचा पुनरुच्चार देखील रामदास आठवले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. 

हे ही वाचा ः शिवसेनेच्या सर्व आमदारांना भाजपशी युती हवी आहे..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख