मंत्रीपदाप्रमाणे नारायण राणे यांचे डोकेही सुक्ष्मच.. - Rane's head is as delicate as a minister's. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

मंत्रीपदाप्रमाणे नारायण राणे यांचे डोकेही सुक्ष्मच..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 ऑगस्ट 2021

राणे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असल्याचा दावा करत ते लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा केला.

जळगावः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुक्ष्म उद्योग खाते मिळाले आहे. या खात्याप्रमाणेच राणे यांचे डोके देखील सुक्ष्म झाले आहे, त्यामुळे ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचे बरळत आहेत, (Rane's head is as delicate as a minister's, Said, Shivsena Leader Gaulabrao Patil) असा टोला  शिवसेना नेते व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

शिवसेना नेते नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच केले होते.  (Central Minister Narayan Rane) यावर गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, नारायण राणे पाहिले किती दिवस अस्वस्थ होते, हे आपण पाहिले आहे.  त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता कुठे निघाला आहे, पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, नंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले.

आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सुक्ष्म- लघु उद्योग खाते देण्यात आले आहे.  त्यामुळे मिळालेल्या खात्या प्रमाणेच त्यांचे डोके देखील सुक्ष्म झाले आहे. (Shivsena State Minister Gulabrao Patil Jalgaon)  एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाण्यात ज्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा कायम फडकवत ठेवला, त्यांचे शिंदे हे शिष्य असल्यामुळे नारायण राणे यांनी  शिंदे यांच्या बाबतीत वर्तवलेला अंदाज म्हणजे चुकलेल्या हवामान खात्यासारखाच असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत परतले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई व आसपासच्या भागात जनआशिर्वाद यात्रा काढण्यात आली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या जनआशिर्वाद यात्रेला सुरूवात केली. तेव्हापासूनच शिवसेना आणि राणे यांच्यात झकपक सुरू आहे. अशातच राणे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असल्याचा दावा करत ते लवकरच भाजपमध्ये येतील, असा दावा केला.

त्यांनतर यावर शिंदे यांनी देखील स्पष्टीकरण देत राणे यांनी हा शोध कुठून लावला, असा सवाल केला होता. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी देखील राणे यांचे डोके त्यांना मिळालेल्या खात्यासारखेच सुक्ष्म झाल्याची कडवट टीका केली आहे. आता पाटील यांच्या टीकेला राणेंकडून काय उत्तर मिळते हे हे पहावे लागेल.

हे ही वाचा ः बैलगाडा शर्यतीबाबत आढळरावांची वळसे पाटलांना साद..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख