विधानसभा अध्यक्षपद काॅंग्रेसकडेच आहे आणि राहील; यावरून कसलाच वाद नाही.. - The presidency of the Assembly is and will remain with the Congress; There is no dispute about this. | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपद काॅंग्रेसकडेच आहे आणि राहील; यावरून कसलाच वाद नाही..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाची माध्यमांनी मोडतोड करुन दाखवल्याने गैरसमज निर्माण झाल्याचेही पाटील म्हणाले.

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदावरून कसलाही वाद नाही, ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडेच अध्यक्षपद आहे आणि ते काँग्रेसकडेच राहिल. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनीही तसे स्पष्ट केले आहे. (The presidency of the Assembly is and will remain with the Congress; There is no dispute about this) नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोविडमुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही, परंतु लवकरच ही निवडणूक पार पडेल, असे काॅंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले.  

विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी आक्रमकपणे केलेले काम आणि भाजपच्या १२ आमदरांवर निलंबनाची केलेली कारवाई, यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. (Congress State Workers Meeting Held on Mumbai Office) शिवसेनेच्या खात्यातील रिक्त असलेले वनमंत्रीपद काॅंग्रेसला देऊन विधानसभा अध्यक्षपद शिवसेना घेणार असल्याचे देखील बोलले जात होते.

या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत या विषयावर पडदा टाकला. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला होता.(Congress Leader H.K.Patil, State President Nana Patole) या आरोपानंतर महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरही महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

पाटील म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असलेला डाटा देण्यास केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. या डाटाचा उपयोग केंद्र सरकारच्या योजना राबवण्यासाठी केला जात असताना तोच डाटा कोर्टात सादर का केला जात नाही. ओबीसींच्या हितासाठी तो डाटा जसा आहे तसा केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावा, अशी प्रदेश काँग्रेसची मागणी आहे.

राज्यातील २४ जिल्हा परिषदा, १४४ नगरपालिका आणि २२ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी व त्यासंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्यामुळे तयारीसाठी वेळ मिळाला आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. काही जिल्हा कमिट्यांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे मागास वर्गाच्या हिताचे रक्षण करणे गरजेचे असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

पटोलेंच्या विधानाचा रोख केंद्राकडे होता..

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाची माध्यमांनी मोडतोड करुन दाखवल्याने गैरसमज निर्माण झाल्याचेही पाटील म्हणाले.  त्यांच्या म्हणण्याचा रोख केंद्र सरकारकडे होता, असा खुलासा त्यांनी केला. आमच्यासाठी हा विषय आता संपला आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.

त्यानंतर जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, संपत कुमार, आशिष दुआ, सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बस्वराज पाटील, शिवाजीराव मोघे, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

हे ही वाचा ः भाजपमधील धर्मयुद्ध, कौरव-पांडव अन् पंकजा मुंडे..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख