शिवसेनेच्या कार्यालयावर जेलमध्ये असलेल्या प्रदीप शर्माचा फोटो ..

वसई तालुक्यात स्थानिक शिवसैनिक विरुद्ध बाहेरचे असा वाद असून आजही येथील शैवसैनिकांना ठाण्याचे नेतृत्व नको आहे.
Shivsena Virar-Pradip Sharma News
Shivsena Virar-Pradip Sharma News

विरार ः विरारमध्ये  प्रमोद दळवी यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयावर तळोजा जेलमध्ये असलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा फोटो लावल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. (Photo of Pradip Sharma in jail at Shiv Sena office ) दळवी हे नालासोपारा विधानसभा  मतदार संघाचे संघटक असल्याने ही बाब विशेष मानली जात आहे.  

नालासोपारा मतदार संघातून शिवसेनेने आयत्यावेळी बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात प्रदीप शर्मा यांना निवडणुकीत उतरविले होते. परंतु त्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांचा पराभव झाला होता. ( Pradip Sharma Incounter Specialist)त्यानंतर ते नालासोपारा मतदार संघात फिरकलेही नव्हते. प्रदीप शर्मा यांचा उजवा हात म्हणून प्रमोद दळवी ओळखले जातात. (Virar Sivsena) त्यांनी सुरु केलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयावर प्रदीप शर्मा यांचा फोटो झळकल्याने शिवसैनिकांमध्ये मात्र चर्चा सुरु झाल्या आहेत.

वसई तालुक्यात स्थानिक शिवसैनिक विरुद्ध बाहेरचे असा वाद असून आजही येथील शैवसैनिकांना ठाण्याचे नेतृत्व नको आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक प्रमोद दळवी यांना लांब ठेवत असल्याचे बोलले जाते. मनसुख हरेन प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली असून सध्या ते एनआयएच्या कोठडीत आहेत.

तर प्रमोद दळवी शिवसेनेचे नालासोपाारा विधानसभा संघटक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचीही गेल्या महिन्यात ईडीने चारवेळा चौकशी केली होती. असे असताना शिवसेनेला अडचणीचे ठरणारे प्रदीप शर्मा यांचा फोटो बॅनरवर लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बाबत पालघर जिल्ह्याचे संपर्क नेते आमदार रवींद्र फाटक यांना विचारले असता अगोदर त्यांनी हा जुना फलक असेल असे सांगितले.  नंतर मात्र याबाबत आपल्याला माहिती नसून माहिती घेऊन सांगतो असे घुमजाव केले.

शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे  या प्रकारावरून दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत बविआला पराभूत करून पालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न बघणाऱ्या शिवसेनेला प्रदीप शर्मा यांच्या फोटोचा फायदा होतो कि नुकसान हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com