नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत जयंत पाटील म्हणाले...

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार, यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत.
Not aware about Congress state president issue says Jayant Patil
Not aware about Congress state president issue says Jayant Patil

मुबंई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार, यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी यावर थेट भाष्य करणे टाळत काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत चर्चेविषयी माहिती नसल्याचे सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष पदाविषयी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असेही वक्तव्य त्यांनी केले. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारीही झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याविषयी विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. पटोले यांच्यासह राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्यामध्ये पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

पटोले हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद गेल्यास त्यांना विधासभेचे अध्यक्षपद सोडावे लागेल. या पदावर कुणाची निवड होणार, याविषयी जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत काय चर्चा सुरू आहे, हे मला माहित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. जशी परिस्थिती बदलते, तसे निर्णय घ्यावे लागतात. ते त्या-त्या वेळी घेण्यात येतील.

 पक्षाने ती जबाबदारी दिल्यास पार पाडेन

प्रदेशाध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पक्षाकडे काहीही मागायचे नाही, हे मी ठरवले आहे. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष होणार, नाही होणार, याबाबत काहीही सांगू शकत नाही. पण पक्षाने ती जबाबदारी दिल्यास निश्चितपणे पार पाडीन, असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची सुप्त इच्छा आता लपून राहिली नाही. जेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले, तेव्हाही यापेक्षा ते प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. पण पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे ते विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच की काय गेल्या एक वर्षातील अध्यक्षांच्या कामकाजाची नोंद यावेळी इलेक्ट्रॉनिक, मुद्रित आणि सर्व माध्यमांनी घेतली, ही गौरवाची बाब आहे. यापूर्वी सरकारच्या कामकाजाचा एक वर्षाचा आढावा माध्यमांकडून घेतला जायचा. यावेळी प्रथमतः विधानसभा अध्यक्षांच्या कामकाकाजाची दखल माध्यमांकडून घेण्यात आली आहे. पक्षाने दिलेल्या पदाचा योग्य उपयोग जनतेसाठी करणे, हे कौशल्य आहे आणि ते करतोय, असे पटोले म्हणाले.   

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com