नितेश राणेंचे सूर बदलले, विकासासाठी शिवसेनेसोबत काम करण्याची ग्वाही.. - Nitesh Rane's tone changed, testimony to work with Shiv Sena for development .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

नितेश राणेंचे सूर बदलले, विकासासाठी शिवसेनेसोबत काम करण्याची ग्वाही..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जुलै 2021

वेंगुर्ले नगर परिषदेच्या वतीने मत्सव्यवसाय बाजरपेठेचे लोकार्पण भाजप-शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.

मुंबई ः शिवसेनेला कायम पाण्यात पाहत आव्हान देण्याची भाषा करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी अचानक शिवसेनेबाबत नरमाईची भूमिका घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले नगर परिषदेच्या एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी चक्क कोकण व महाराष्ट्राच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शवली. (Nitesh Rane's tone changed, testimony to work with Shiv Sena for development) विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, नेते दिपक केसरकर उपस्थित होते.

शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत नितेश राणे यांनी घेतलेली ही भूमिका सर्वानाच आश्चर्यांचा धक्का देणारी होती. (Bjp Mla Nitesh Rane, Kokan) व्यासपीठावरील हे चित्र दोघांच्याही समर्थकांना सुखावणारे असून राज्यात युतीची चर्चा सुरू असतांना महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित काम करण्याची आपली तयारी असल्याचेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. (Shivsena Mp Sindhudurg Vinayk Raut) नारायण राणे, नितेश व निलेश राणे हे संपुर्ण कुंटुबियच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

३५-४० वर्ष शिवसेनेत काढलेली असल्यामुळे तो आक्रमकपणा राणे पिता-पुत्रांनी अनेकदा दाखवून दिला. भाजपचे आमदार नितेश राणे हे तर यात नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. विधानसभेच्या सभागृहात आणि बाहेर देखील नितेश राणे यांनी नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, खासदार विनायक राऊत यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे.

नुकतीच विधानसभेचे अधिवेशन सुरू असतांना आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे नितेश राणे पहिल्यांदा बॅकफूटवर आल्याचे आणि त्यांनी त्याबद्दल क्षमा मागितल्याचे दिसून आले होते. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर राणे कुटुंबियाचा शिवसेना द्वेष आणखी वाढेल आणि ते अधिक आक्रमकपणे शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडतील असे वाटत होते. परंतु नितेश राणे यांनी घेतलेली मवाळ भूमिका आणि राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती होऊ शकते हे दिलेले संकेत महत्वाचे मानले जात आहेत.

वेंगुर्ले नगर परिषदेच्या वतीने मत्सव्यवसाय बाजरपेठेचे लोकार्पण भाजप-शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला व्यासपीठावर जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, नेते दिपक केसरकर आणि आमदार नितेश राणे हे शेजारी बसले होते. नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली की त्याला जशास तसे उत्तर देण्याची जबाबदारी असलेले विनायक राऊत व्यासपीठावर असल्याने या  दोघांमध्ये राजकीय कलगितुरा रंगणार अशी अपेक्षा उपस्थितांना होती, पण घडले नेमके उलटेच.

युतीचे संकेत ?

नितेश राणे यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावर शिवसेना-भाजपचे नेते एकत्रित उपस्थित असल्याचा उल्लेख करत हे चित्र दोघांच्याही समर्थकांना सुखावणारे असल्याचा उल्लेख केला. एढ्यावरच ते थांबले नाहीत, तर कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रसंगी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करायला आपण व भाजपचे पदाधिकारी तयार असल्याचेही सांगतिले.

राज्यात युतीची चर्चा सुरू असतांना व्यासपीठावरील चित्र सुखावणारे असल्याचेही नितेश राणे म्हणाले.  राणे यांच्या या बदललेल्या भाषा आणि भूमिकेमुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेला सुरूवात झाली आहे.

हे ही वाचा ः भुमरे म्हणतात, मी खरेदी केलेला प्लाॅट मलबार हिलचा आहे का? किमंत ऐकून डोकं चक्रावलं..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख