नारायण राणे आमची `अ‍ॅसेट`सगळा पक्ष त्यांच्या पाठीशी..

शिवसेना-भाजपमध्ये कायमचे शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा कारवायांमधून सुरू केला आहे.
नारायण राणे आमची `अ‍ॅसेट`सगळा पक्ष त्यांच्या पाठीशी..
Bjp Chandrakant Patil- Rane News Mumbai

मुंबई ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वाक्याचा विपर्यास केला गेला. मी तुमच्या घरी येऊन थोबाडीत मारेन अस काही ते म्हणाले नव्हते. त्यामुळे सरकार सत्तेचा गैरवापर करून किता जणांच्या मागे लागणार हा खरा प्रश्न आहे. ठोशास ठोसा अशी राणे यांची आक्रमक संस्कृती आहे, त्यामुळे त्यांच्या या संस्कृतीने भाजपच्या सुसंस्कृत चेहऱ्याला कुठल्याही प्रकारची बाधा पोहचत नाही. (Narayan Rane Our Asset; All parties with their backs. Said, Bjp State President Chandrakant Patil, Maharashtra) राणे हे आमची अॅसेट आहेत, त्यामुळे संपुर्ण भाजप पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी तसे पत्रच काढले असून गृहमंत्री अमित शहा यांनी देखील राणे यांच्यांशी फोनवरून संपर्क साधत त्यांना पक्षाचा पुर्ण पाठिंबा असल्याचा विश्वास दिला आहे, असेही पाटील यांनी सांगितले. (Central Minister Narayan Rane) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले होते. त्याचे पडसाद आज राज्यभरात उमटले, ठिकठिकाणी राणे यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनं केली. (Chief Minister Uddhav Thackeray) तर काही भागात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

एकीकडे हे सुरू असतांना दुसरीकडे रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. राणे यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आणि राज्यातील तीन पक्षाच्या सरकारने सूडबुद्धीने केलेली ही कारवाई असल्याचे म्हटले. या संपुर्ण प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अनैसर्गिकरित्या सत्तेवर आलेल्या या सरकारने कुठलेही अटक वाॅरंट नसतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यादांच एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा हा प्रकार लोकांनी निवडून न दिलेल्या, सत्तेसाठी एकत्रित आलेल्या सरकारने केला आहे. सत्तेचा किती गैरवापर करणार, कुणाकुणाच्या मागे लागणार. एवढंच असेल तर सरकारमधून बाहेर पडा आणि रस्त्यावर या मग बघू पुढे काय होते ते? असे आव्हान देखील पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले.

नारायण राणे यांनी केलेले विधान हे चुकीचे किंवा आक्षेपाहार्य नाही, आपल्या आक्रमक स्वभावानूसार ते त्यांनी केले आहे. प्रत्येकाची बोलण्याची शैली असते. आमचे दुसरे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याबद्दल देखील अनेकदा असे वाद निर्माण केले गेले. पण जेव्हा आमच्या मराठवाड्यात अशीच भाषा वापरतात हे त्यांनी पटवून दिले, तेव्हा सगळ्यांनाच ते पटले. त्यामुळे राणे यांचा स्वभाव हा जशास तसे असा आहे, कराड,कपिल पाटील किंवा भारती पवार यांचे स्वभाव वेगळे आहेत. त्यामुळे हा स्वभावाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे.

मी तिथे असतो तर थोबाडीत मारले असते असं राणे म्हणाले होते. पण दाखवतांना जणू काही मी तुमच्या घरी येऊन थोबीडीत मारीन असे म्हटल्याचे दाखवले गेले. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने अटकर वाॅरट नसतांना विविध कलम लावून राणेंना अटक करण्यात आली, याच्या विरोधात भाजप आक्रमक आंदोलन करणार आहे. हिंसा ही भाजपची संस्कृती नसली तरी सरकारच्या कारवाई विरोधातील आंदोलन हे जोरात झाले पाहिजे, असे आम्ही सांगितले असल्याचेही पाटील म्हणाले.

राज्यपालांना म्हतारा म्हटलेलं चालतं?

नारायण राणे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून त्यांना अटक केली जाते, त्यावरून रान उठवले जाते, मिडियाही त्यात सहभागी होते. मग राज्यपालांना म्हातारा म्हणणे, पंतप्रधांनाना चोर, दसरा मेळाव्यात लाठ्या, काठ्या, तलवारी, पायाखाली तुडवू अशी भाषा चालते का? ते व्हिडिओ देखील काढून आज दाखवा? असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांना केले. राज्यात अनैसर्गीकरित्या सत्तेत आलेल्या तीन पक्षातील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपपासून तोडण्यात यशस्वी झाले आहेत.

भाजपशी गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली मैत्री तोडण्याच्या हेतूनेच राज्यात हे तीन पक्ष एकत्र आले होते. आता शिवसेना-भाजपमध्ये कायमचे शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशा कारवायांमधून सुरू केला आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर या दोन पक्षाचे नेते ताज हाॅटेलमध्ये सेलिब्रेशन करत असतील, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

राज्य सरकारने केंद्रीय मंत्री राणे यांना अटक केल्यानंतर भाजपचे राज्यातील सगळे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना आमच्या अधिकारांचे हनणन होत असल्याबद्दल निवेदन देणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. याशिवाय राज्य सरकार विरोधात केंद्रात मंत्री व खासदार असलेले भाजपचे नेते याचिका देखील दाखल करणार असल्याचे पाटील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in