मोदी सरकारकडून पुन्हा महाराष्ट्रद्वेष, आंतरराष्ट्रीय मदतीत डावलले : सचिन सावंत - modi government hates maharashtra government again seeks international helps | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारकडून पुन्हा महाराष्ट्रद्वेष, आंतरराष्ट्रीय मदतीत डावलले : सचिन सावंत

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 मे 2021

केंद्रीय यंत्रणांकडून मदतीचे होणारे वाटप हे ‘पीएम केअर’ निधीप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पद्धतीला छेद देणारेही आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्न वागणूक देत आहे.

मुंबई : ‘नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) कोरोनाच्या (Corona) संकटात मदत करतानाही महाराष्ट्राशी भेदभाव (Discrimination against Maharashtra) करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोनाकाळात ४० देशांनी (40 countries) केलेल्या मदत वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्राला (Maharashtra) डावलले आहे. महाराष्ट्र वगळून भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाना, बिहार व अन्य राज्यांना मदत दिली जात आहे’, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आज केला.

केंद्र सरकारच्या या कृतीचा काँग्रेस जाहीर निषेध करत असून राज्यातील भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. भारतात अनेक देशांतून मदत आली आहे. तेथील अनेक भारतीय वंशाच्या लोकांना भारतातील आपापल्या राज्यांना मदत करावयाची असेल. या आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क आहे आणि ती थेट राज्यांना का दिली जात नाही, असा सवाल सावंत यांनी केला.

केंद्रीय यंत्रणांकडून मदतीचे होणारे वाटप हे ‘पीएम केअर’ निधीप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पद्धतीला छेद देणारेही आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्न वागणूक देत आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्राकडून राज्यावर अन्याय केला जात आहे, असेही ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख