गेल्या पंधरा महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे पाय मंत्रालयाला लागलेच नाहीत..

गेल्या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये साथ ओसल्यानंतर मंत्रालयातील कामांना वेग आला, तरीही ठाकरे काही मंत्रालयात आले नाहीत.
Cm Uddhav Thackeray-Mantralya Mumbai news
Cm Uddhav Thackeray-Mantralya Mumbai news

मुंबई  : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 'मातोश्री` बाहेर पडत नसल्याची विरोधकांची टीका अजूनही कायम असतानाच, गेल्या १५ महिन्यांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एकदाही मंत्रालयाची पायरी चढली नसल्याचे उघड झाले आहे. (In the last fifteen months, the Chief Minister's feet have not touched the ministry.)  कोरोना, लोकांच्या गर्दीमुळे ठाकरे  येत नसल्याचे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था, प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी, मुख्यमंत्री भेटत नसल्याचा सूर विरोधकांसह महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये आहे. परंतु, ते मातोश्री, वर्षा आणि सह्याद्री अतिथिगृहातूनच आपली कामे आटोपत असल्याचे मंत्री सांगत आहेत.

लॉकडाऊनमध्ये गेल्या वर्षी मार्च महिना आणि त्यानंतरचे काही दिवस अत्यावश्यक सेवा वगळता मंत्रालयातील सर्व कामे बंद होती. (CM Uddhav Thackeray Chief Minister Maharashtra) त्यात आपल्यामुळे सुरक्षा व्यवस्था, प्रशासन आणि राजकीय मंडळींची धावपळ होऊन, गर्दी होण्याच्या शक्यतेने  मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात न जातान मातोश्री, वर्षा आणि सह्याद्रीवरून मंत्रीमंडळाच्या बैठक घेतल्या. राज्यभरातील लोकांशी संवाद ठेवला, त्यावरून मुख्यमंत्री घराबाहेर येत नसल्याची विरोधकांची टीका चर्चेत आली.

गेल्या वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये साथ ओसल्यानंतर मंत्रालयातील कामांना वेग आला, तरीही ठाकरे काही मंत्रालयात आले नाहीत. (Minsiter Aditya Thackeray, Maharashtra) या काळात लोकांची आणि खासगी कामे घेऊन येणाऱ्या आमदारांच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दालनात चकरा वाढल्या. परंतु, ते नसल्याचा 'निरोप' घेऊन आमदारांना काढता पाय घ्यावा लागायचा. मुख्यमंत्री भेटत नसल्याचे छोटे पोस्टर्स लावून आमदार रवी राणा यांनी तर आपली नाराजी उघड केली होती.

त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर (२०२०) या काळात कोरोना संपल्याचे सांगत सर्व व्यवहार सुरळीत झाले, तरीही ठाकरे हे मंत्रालयाकडे फिरकले नसलयाने आश्चर्य व्यक्त होत आहे.  दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह सर्वच मंत्री आठवड्यातून किमान तीन-चार दिवस मंत्रालयातून आपले कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हेच येत नसल्याची चर्चा आहे. 

सातवा मजला रिकामाच..

मंत्रालयातील सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांची दालने आहेत. मुख्यमंत्र्याप्रमाणेच आदित्यही आपल्या दालनात म्हणजे, मंत्रालयात येत नसल्याचे तेथील कर्मचारी सांगतात. त्यामुळे मंत्रालयाच्या जुन्या नव्या इमारतीतील सातवा मजला वगळता इतर मजल्यांवर मंत्री, आमदार अधिकारी, आणि लोकांची गर्दी पाहायला मिळते.

कोरोना काळात मुख्यमंत्री ठाकरे मातोश्री बाहेर येत नसल्यावरून विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना वारंवार हिणवले आहे. त्यावर गर्दी टाळणे, ऑनलाइन बैठका होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री विरोधकांच्या टीकेला उत्तरे दिली.  मात्र, शिवसेनेच्या मेळाव्यातही ठाकरे यांनी घराबाहेर न येण्याचा आपल्यावरील आरोपाचा मुद्दा उपस्थित करत घराबाहेर आल्यानंतर काय होईल बघा, अशा शब्दांत विरोधकांना सुनावले होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com