कोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..

या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पुल नुकसानग्रस्त झाले आहेत.
कोकण, पुणे विभागात दीडशे पूल पाण्याखाली, तीनशे रस्ते बंद..
Pwd Minister Order his Officer for Vist Pune, Kokan news Mumbai

मुंबई : राज्यातील कोकण व पुणे विभागात पडलेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना दौरा करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.(In Konkan, Pune division; One and a half hundred bridges under water, three hundred roads closed)

नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Pwd Minister Ashok Chavan Maharashtra)  राज्यात गेल्या काही दिवसात पुणे तसेच कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते व पुल नुकसानग्रस्त झाले आहेत. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रभावित जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.

त्यानुसार, सातारा व पुणे जिल्ह्यात पुण्याचे मुख्य अभियंता साळुंखे, सांगली जिल्ह्यात औरंगाबादचे मुख्य अभियंता  उकिर्डे, कोल्हापूरमध्ये मुंबईचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, पालघर व ठाणे जिल्ह्यात नाशिकचे मुख्य अभियंता पी.बी. भोसले आणि रायगडमध्ये सहसचिव  रामगुडे हे भेट देणार आहेत.

या अधिकाऱ्यांनी शासनास दररोज अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार, २९० रस्ते बंद पडले आहेत. तर ४६९ रस्त्यांवरची वाहतूक खंडित झाली आहे. या शिवाय १४० पूल  हे पाण्याखाली गेले असल्याचे समजते.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in