करुणा मुंडे रविवारी परळीत येणार; पतीविरोधात खळबळजनक खुलाशांचा दावा..

पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय काय षडयंत्र रचले जात आहेत, हे देखील मी सांगणार आहे. तसं तर माझ्या पतीने अनेक नेत्यांबद्दल मला बरंच काही सांगितलं आहे.
करुणा मुंडे रविवारी परळीत येणार; पतीविरोधात खळबळजनक खुलाशांचा दावा..
Karuna Munde-Dhnanjay Munde News Mumbai

मुंबई ः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला व मुलांना परळीत आल्यास मुलासंह जिंवत जाळण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. (Karuna Munde will return to Parli on Sunday; Sensational revelations against husband) पण अशा धमक्यांना भीक न घालता रविवारी दुपारी बारा वाजता आपण मुलांसह परळीत, आपल्या सासरी येऊन पत्रकार परिषदेत सगळ्या गोष्टींचा खुलासा, त्याचे पुरावे प्रसार माध्यमांना देणार असल्याचा व्हिडिओ करुणा मुंडे यांनी जाहीर केला आहे. 

करुणा मुंडे यांनी सोशल मिडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक नेत्यांची नावे घेत गंभीर आरोप, खळबजनक खुलासे केले आहेत. (Karuna Mundes Viral Video) करूणा मुंडे यांचा एक व्हिडिओ दिवसभरापासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आणि राजकीय वर्तुळात भूंकप घडवणारे आहेत.

धनंजय मुंडे यांच्यासोबत २५ वर्षापासून संसार करत असतांना त्यांनी कुणा विरोधात, कसे आणि किती षडयंत्र रचले याचा उलगडा करुणा मुंडे यांनी नावासह या व्हिडिओमध्ये केला आहे. 

या खळबळजनक व्हिडिओमध्ये करुणा मुंडे म्हणतात, काही दिवसांपासून मला धमक्या येत आहेत. (Minister Dhnanjay Munde Maharashtra) माझ्याबद्दल आतापर्यंत ज्या काही चर्चा सोशल मिडियावर किंवा समाजात सुरू होत्या, त्याचा खुलासा मी रविवारी परळीत पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत. मी पहिली पत्नी आहे, दुसरी की पाचवी अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे.

मला खूप धमक्या दिल्या जात आहेत. माझ्याकडे काही पुरावे आहेत, ते मी फेसबुकवर टाकण्याचा विचार केला. तेव्हा माझ्या पतीच्या मुलाच्या वयाच्या एका मुलीने मला तुझ्यावर केस करील अशी धमकी दिली आहे. पण मी तिच्या धमक्यांना भीक घालत नाही. 

बापाच्या वयाच्या मुलीवर हा पैसे उधळतो आहे, मी लग्नाची बायको आहे. २५ वर्ष मी दिली आहेत. तेव्हा अशा धमक्यांनी मी घाबरणार नाही. माझ्यासोबत २५ वर्षात काय झाले, माझ्या आईचा मृत्यू कसा झाला? माझ्या बहीणी सोबत काय झाले? या सर्व गोष्टींचा खुलासा मी परळीत येऊन करणार आहे.

याशिवाय मी सीबीआयकडे देखील जाणार आहे. माझ्या पतीचे व  इतर सगळ्याचे व्हॅटसेप चाट, काॅल रेकाॅर्डिंग तपासली जावीत, ती सार्वजनिक करावीत. जर सीबीआय हे करणार नसेल तर मी रविवारी पत्रकार परिषदेत हे पुरावे प्रसार माध्यमांना देईल, असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

षडयंत्रांचा भांडाफोड करणार..

पंचवीस वर्षात माझ्यासोबत काय झाले, कसा अन्याय झाला. माझ्या मुलांनाच आज माझ्या विरोधात उभे केले जात आहे, त्यांना बंदी बनवले जात आहे. माझ्या पतीने फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे आज त्यांच्या मुला-मुलींच्या मागे लागले आहेत.

कुठलाही नीच माणूस असे कृत्य करणार नाही, असे प्रकार माझ्या व मुलांच्या बाबतीत केले जात आहेत. पंकजा मुंडे यांच्या विरोधात कसे षडयंत्र रचले जात आहे, गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात कसे षडयंत्र रचले गेले होते, या सगळ्या गोष्टी मी रविवारी पत्रकारांना सांगणार आहे.

मला धमक्या दिल्या जात आहेत. पंचवीस वर्षापासून मी नरक यातना भोगते आहे, त्यामुळे मी घाबरणार नाही. मी परळीत आले तर मला जिंवत जाळले जाईल, अशा धमक्या मला दिल्या जात आहे. पण मला व माझ्या मुलांना जिवंत जाळून दाखवाच, असे आव्हान देखील करुणा मुंडे यांनी दिले आहे. मी हे सगंळ पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याचे माझे पती लोकांना सांगत फिरत आहेत.

पण मी राजकारणात वावरण्यासाठी आणि महागड्या साड्या, दागिने घालण्यासाठी हे सगळं सहन करत नाहीये. मी माझा पॅनकार्ड नंबर जाहीर करते आहे, ज्याला कुणाला मी हे सगळं पैशासाठी करते असे वाटत असेल त्यांनी माझ्या नावावर किती संपत्ती आहे हे तपासून घ्यावे. 

पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय काय षडयंत्र रचले जात आहेत, हे देखील मी सांगणार आहे. तसं तर माझ्या पतीने अनेक नेत्यांबद्दल मला बरंच काही सांगितलं आहे. अगदी अजितदादांपासून अनेक नेत्यांबद्दल मला माहिती आहे. पण मी त्यात जाणार नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद आहेत, परिवारातल्या आहेत त्यामुळे मी बोलणार आहे.

आतापर्यंत मी त्यांच्याबद्दल बोलले नाही, पण आता सांगते की येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत मी तुमच्या सोबत उभी राहीन, तुमच्या पाठीशी राहील. कारण गेल्या २५ वर्षात मी माझ्या घरात बघते आहे, की हा माणूस किती षडयंत्रकारी आहे. त्यामुळे मी रविवारी येणार आणि या सगळ्या गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in