दिल्लीतून कुणीही येईल आणि राज्य करेल हे चालणार नाही, पश्चिम बंगालने दाखवून दिले..

मोदी-शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतल्या, सगळी शक्तीपणाला लावली, पण त्यांना दीदीचा पराभव करता आला नाही.
Mp Sanjay raut intraction on West Bangal Victory news mumbai
Mp Sanjay raut intraction on West Bangal Victory news mumbai

मुंबई ः प्रत्येक राज्याची एक अस्मिता, संस्कृती असते, लोकशाहीत प्रत्येकाला अपले मत मांडण्याचा आणि ते देण्याचा अधिकार दिलेला आहे.  असे असतांना दिल्लीत सत्ताधाऱ्यांनी एखाद्या राज्यात जाऊन सगळी शक्तीपणाला लावयची, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह देशभरातील नेते, मंत्री, कार्यकर्ते घेऊन एक राज्य जिंकण्यासाठी महिनो महिने ठाण मांडून बसायचे. केंद्रीय यंत्रणाचा दबाव आणून त्रास द्यायचा, हे सगळं सोसून देखील पश्चिम बंगालच्या जनतेने आणि ममता दीदींनी एक अभूतपुर्व असा विजय मिळवला आहे.

दिल्लीहून कुणीही येईल, दबाव आणि सत्तेचा गैरवापर करत राज्याची सत्ता हस्तगत करेल हा जो भ्रम होता तो येथील जनतेने खोटा ठरवला आहे. या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याला स्वतःचे मत आणि काही अधिकार आहेत हे या निकालाने दाखवून दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये जखमी वाघिणीने मिळवलेला हा विजय देशाला दिशा देणारा ठरेल, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या विजयाबद्दल ममता बॅनर्जी व तेथील जनतेचे अभिनंदन केले.

पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. संपुर्ण देशाचे आणि जगाचे देखील लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये केंद्राची सत्ता, ताकद आणि विविध तपास यंत्रणाचा दबाव झुगारू ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमल काॅंग्रेसने बहुमतासह सत्ता हस्तगत केली. या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला पश्चिम बंगालच्या जनतेने एक धडा दिल्याची चर्चा देखील या निमित्ताने सुरू आहे.

देशात कोरोनाचा कहर असतांना देखील सगळे नियम धाब्यावर बसवून मोदी-शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतल्या, सगळी शक्तीपणाला लावली, पण त्यांना दीदीचा पराभव करता आला नाही. भाजपच्या पराभवावर व ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करतांना संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये पश्चिम बंगालचा विजय हा देशासाठी एक प्रकाश दाखवणाऱ्या मशाली प्रमाणे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये दिल्लीतून कुणीही येईल आणि राज्य करेल असे वाटणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. सत्तेचा व केंद्रीय संस्थाचा गैरवापर करत भाजपने ममता दीदींनी प्रचंड त्रास दिला, पण त्या डगमगल्या नाहीत, की घाबरल्या नाहीत. एखादी जखमी वाघिण जशी जोरात हल्ला चढवते त्या पद्धतीने ममता बॅनर्जी लढल्या. पायाला दुखापत झालेली असतांना देखील त्यांनी प्रचार केला. त्यांच्या या लढवय्या वृत्तीचा आणि पश्चिम बंगालच्या जनतेच्या त्यांच्यावर असलेला विश्वास याचा हा विजय आहे.

देश कोरोनाशी, तर मोदी शहा ममतांशी लढत होते..

संपुर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता, लोक कोरोनाशी लढा देत होते, त्याचवेळी देशाचा पंतप्रधान, गृहमंत्री हे मात्र ममतांच्या विरोधात लढत होते. कोरोनाचे सगळे नियम पायदळी तुडवत भाजपने तिथे प्रचार सभा घेतल्या. पण पश्चिम बंगालच्या जनतेवर ममता बॅनर्जींचे किती वर्चस्व आहे हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे.

शिवसेनेने या विजयाबद्दल ममता दीदींचे अभिनंदन केले आहेच, सुरूवातीपासूनच आम्ही ममता बॅनर्जी या भाजपला रोखणार यावर ठाम होतो. शिवसेनेचे पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी देखील दीदींचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले. पश्चिम बंगालमधील विजयानंतर देशात भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे दिले जावे का? या प्रश्नावर हा निर्णय सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे घेतील.असेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जातील अशी चर्चा होती, यावर बोलतांना सजंय राऊत यांनी भाजपला चांगलाच चिमटा काढला. भाजपचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सुरू आहेच. आता त्यांना भरपूर वेळ आहे, साडेतीनवर्ष त्यांनी प्रयत्न करत राहावेत. पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश मिळणार नाही.

पंढरपूरचा निकाल धक्कादायक

राज्यातील पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडुकीच्या निकाला संदर्भात निश्चितच हा पराभव आमच्यासाठी विचार करायला लावणारा असल्याचे राऊत म्हणाले. तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर आमची ताकद, मते वाढली होती, तरी देखील आम्हाला पराभव स्वीकारावा लागत आहे, याचा आम्ही विचार करू. काही स्थानिक गणितं असतात त्यामुळे कधी कधी अशा प्रकारचे निकाल लागतात.

बेळगांव लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव होत असल्याकडे राऊत यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले या निवडणुकीच्या निमित्ताने सीमा भागातील मराठी माणूस एकवटला ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. येथील उमेदवार शेळके यांनी एक ते दीड लाख मते घेतली तर पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने आम्हाला तयारी करता येईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com