स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रच लढू, अशी तीन्ही पक्षांची भूमिका नाही..

तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होईल, अशी परिस्थिती नाही.
Ncp Nawab Malik News Mumbai
Ncp Nawab Malik News Mumbai

मुंबई :  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रच लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. (It is not the role of the three parties that we will fight together at the local level.)  तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीनही पक्षांनी वेळोवेळी घेतली होती. (Ncp Spokeperson Nawab Malik Maharashtra) विशेषतः काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली, त्यानंतर ही भूमिका प्रामुख्याने पुढे आली.

परभणी जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष वाढलेला असतांनाच शिवसेना खासदार संजय जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घनसावंगी येथील मेळाव्यात केली. (Shivsena Mp Sanjay Jadhav Parbhani) राष्ट्रवादी विरुद्ध आक्रमक झालेल्या जाधव यांनी आम्ही तुम्हाला कधीही बुडवू शकतो, असा  इशाराही दिला.

या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांना प्रश्न विचारला असता वरील भूमिका मांडली. मलिक म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या स्थानिक परिस्थितीनुसार होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होईल, अशी परिस्थिती नाही.  

काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही, तर कुठे कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील आणि  बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी - शिवसेना लढत होणार आहे.  ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल तिथे  परिस्थिती बघून निर्णय होणार आहेत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com