मोदी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना अधिकारच किती? ते फक्त बोलण्यापुरते मंत्री..

त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. मात्र बोलून कामे होत नसतात.
Nawab Malik-Raosaheb Danve News Mumbai
Nawab Malik-Raosaheb Danve News Mumbai

मुंबई :  मोदीसाहेबांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना किती अधिकार आहेत, राज्यमंत्र्यांना किती अधिकार व कितीजण धोरण ठरवतात हे देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला माहीत आहे. त्यामुळे ज्या मंत्र्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत, त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही,  (How much power do ministers of state have in Modi government? They are ministers just to talk.)असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यासंदर्भात एक महत्वाची घोषणा केली. (Ncp Spokeperon Nawab Malik) त्यानूसार ज्या नागरिकाने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले अशांना अॅपवरून पास देण्याचेही जाहीर केले. यासाठी वापरण्यात येणारा क्युआर कोड कुणी तपासायचा असा मुद्दा उपस्थित करत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी असमर्थता दर्शवली. (Central Railway State Minister Raosaheb Danve) रेल्वे क्युआर कोड तपासणार नाही, मुंबईत लोकल सुरू करण्याची घोषणा करण्याआधी आम्हाला कळवायला हवे होते, असा नाराजीचा सूरही दानवे यांनी लावला होता.

यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतांनाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दानवे यांना अधिकार किती असे म्हणत चिमटा काढला आहे. १५ ऑगस्टपासून रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर तसा प्रस्ताव रेल्वेमंत्रालयाकडे आला नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.  

या संदर्भात पत्रकांनी  नवाब मलिक यांना विचारले असता, ते म्हणाले, रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना किती अधिकार आहेत हे मला माहीत नाही. मात्र बोलून कामे होत नसतात, मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी रेल्वे सुरू आहे. त्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशांना १५ ऑगस्टपासून प्रवेश देण्याची माहिती रेल्वेला राज्य सरकारकडून जाणार आहेच. ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, त्यामुळे तो प्रस्ताव जाणारच आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com