लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या; केंद्राला प्रस्ताव पाठवणार..

समाजातील तरुणांना एका विशिष्ट बिझनेस मॉड्युल अंतर्गत अर्थसहाय्य मिळावे याबाबतचे एक धोरण राज्य शासन आखत आहे.
minister dhnanjay munde meeting news mumbai
minister dhnanjay munde meeting news mumbai

मुंबई : राज्यातील मातंग समाजाचे मागासलेपण ओळखून, त्यांच्या प्रश्न व समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक योजना आखण्यासाठी २००३ साली नेमण्यात आलेल्या क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. (Give Bharat Ratna to Lokshahir Annabhau Sathe; The proposal will be sent to the Center.) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान मिळावा, यासाठी येत्या अधिवेशनात प्रस्ताव पारित करून तो केंद्राल पाठवणार असल्याचेही मुंडे म्हणाले.

२००३ साली तत्कालीन सरकारने नेमलेल्या या आयोगाला २००८ मध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले खरे परंतु, या आयोगाने सुचवलेल्या ८२ शिफारशीपैकी एकही शिफारस प्रत्यक्षात अंमलात आणली गेली नव्हती. (Minister Dhnanjay Munde)  म्हणून या आयोगाचे पुनर्गठन करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार पृथ्वीराज साठे व शिष्टमंडळाने केली होती.

या मागणीचा सकारात्मक विचार करत आयोगाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश  मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. (Vidhan Parishad Chairman Dr. Nilam Gorhe)  या अभ्यास आयोगाने आपला अहवाल एक वर्षात सादर करावा असे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी दिले आहेत. 

मातंग समाजाचे विविध प्रश्न व मागण्यांसंदर्भात मंत्रालयात डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत एका व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Loksahir Annabhau Sathe) मुंबईतील घाटकोपर येथील चिरागनगर भागात एसआरए व म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारच्या माध्यमातुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम सुरू आहे.

या कामाचा काही दिवसातच एक स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल तसेच या कामास गती देण्यात येईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन आपण केंद्र सरकारला विनंती केली असुन, येणाऱ्या अधिवेशन काळात याबाबतचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचे मुंडें यांनी बैठकीत सांगितले. 

या शिवाय पुण्यातील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक उभारणीच्या कामात भूसंपादन व अन्य अडचणी येत असून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून हे अडसर दूर करण्यात येतील.  या स्मारकाच्या उभारणीच्या कामास गती देण्यात येईल असेही मुंडे म्हणाले. 

महामंडळाच्या माध्यमातून  ५ लाखांपर्यंत कर्ज..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी देण्यात येणारी कर्जमार्यादा ५ लाखांपर्यंत वाढविण्यात यावी तसेच समाजातील कृषी विभागाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कृषी केंद्र उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे.  याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

स्टॅण्ड अप इंडिया कार्यक्रमांतर्गत उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील असलेल्या समाजातील तरुणांना एका विशिष्ट बिझनेस मॉड्युल अंतर्गत अर्थसहाय्य मिळावे याबाबतचे एक धोरण राज्य शासन आखत आहे.  कोविड विषयक निर्बंध जसजसे कमी होत जातील, त्यानुसार ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मुंडे यांनी सांगितले.

दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गाला लागू असलेल्या आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रवर्गांमध्ये वर्गीकरण करावे यासाठीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणास शासनामार्फत वकील देणे, बार्टीच्या धर्तीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संस्था उभारणे आदी विषयांबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीस लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे संचालक अनिल अहिरे, सोलापूरचे शिवसेना नेते व माजी मंत्री उत्तम खंगारे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजीव आवळे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे विजय डाकले, बाळासाहेब भांडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, रवींद्र खेबुडकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com