‘तो’ मुद्दा आधी संपवायचा आहे, असे म्हणत सभापतींनी पुन्हा तहकूब केले कामकाज…  - first to complete that point said rajraje naik nimbalkar and postpone the work | Politics Marathi News - Sarkarnama

‘तो’ मुद्दा आधी संपवायचा आहे, असे म्हणत सभापतींनी पुन्हा तहकूब केले कामकाज… 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

आजही राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाच्या विषयावर इम्पेरिकल डाटा मागवण्यात आला आहे. त्यावर आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे. तो आपण द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभापतींकडे केली.

नागपूर : पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसांचे आहे. त्यात एकही मंत्री विधान परिषदेत उपस्थित नाहीत No minister is present in the legeslativ councilआणि आम्हाला ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलू दिले जात नाहीये, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Leader of Opposition Pravi Darekar नी केला. त्यावर मी स्वतः दोन वेळा सभागृह तहकूब केले आहे. कलम १०६ वर चर्चा घ्यायची की नाही, हा एक मुद्दा संपवायचा आहे, असे म्हणत सभापती रामराजे निंबाळकर Ramraje Nimbalkar यांनी सभागृह पुन्हा २० मिनिटांसाठी तहकूब केले. 

अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. उद्या दुसरा म्हणजे शेवटचा दिवस आहे. वेळ फार कमी आहे आणि त्यातही आम्हाला आजचा ज्वलंत प्रश्‍न असलेल्या ओबीसींच्या मुद्यावर बोलले जाऊ देत नाहीये. कामकाज काहीच होत नाहीये कारण एकही मंत्री विधान परिषदेत उपस्थित नाही, असे आमदार जयंत पाटील यांनी म्हटल्यावर ही बाब तुमच्या आधी माझ्याच लक्षात आली. त्यामुळे मी दोनदा सभागृह तहकूब केले आणि तिसऱ्यांदा उपसभापतींना सभागृह तहकूब करण्यासाठी पुन्हा पाठविले, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सांगत कामकाज तहकूब केले. त्यानंतर ३ वाजून ११ मिनीटांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी येऊन कामकाज पुन्हा २० मिनिटांसाठी तहकूब करीत असल्याचे सांगितले. 

सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचे कारण की, नियम १०६ वर चर्चा घ्यायची की नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा संपावायचा आहे. परंतु याबाबत मंत्र्यांची आणि माझी बैठक अद्यापही झाली नाही. मंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा घडवून आणली जाईल. परिवहन संसदीय कार्य मंत्री यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. 

हे सुद्धा वाचा : कोल वॉशरी घोटाळा : हिंद एनर्जीची चौकशी केल्यास अनेक जण तुरुंगात जातील

आजही राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाच्या विषयावर इम्पेरिकल डाटा मागवण्यात आला आहे. त्यावर आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे. तो आपण द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभापतींकडे केली. त्यावर उत्तर दिल्यानंतर सभापती पुन्हा सभागृहात आलेच नाहीत. उपसभापतींना पाठवून पुन्हा दोन वेळा विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख