उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना मोदी, शहा बाहेर दिसले का?

महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या प्रमुखाकडे असतात. महाविकास आघाडीचे सरकार झाले तेव्हा ते सर्वानुमते उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी नाराजीतून बोलले असे नाही, उलट त्यांनी मुख्यमंत्री चांगले काम करत असल्याचे मत व्यक्त केले, याकडेही राऊत यानी लक्ष वेधले. युतीचे सरकार असतांना आम्ही देखील आम्हाला काही अधिकार नाहीत असे बोलायचोच.
sena ledar sanjay raut news
sena ledar sanjay raut news

औरंगाबादः कोरोनाच्या संकटात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बाहेर पडले नाहीत, त्यांची प्रकृती बरी नाही का? त्यांना झेपत नाही का? अशी टिका करणाऱ्या विरोधकांच्या प्रकृतीपेक्षा मुख्यमंत्र्यांची प्रकृती मुळातच चांगली आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सगळ्यांना बाहेर न पडता ‘वर्क फ्रॉम होम'च्या सूचना त्यांनी दिल्या होत्या, आम्ही केंद्राचा आदेश मानतो. मुळात गरज आणि आवश्यकता असेल तेव्हा उध्दव ठाकरे बाहेर पडतातच.मुख्यमंत्र्यावर टिका करणाऱ्यांना मोदी, शहा तरी बाहेर दिसलेत का? असा रोखठोक सवाल करत शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

राज्यातील राजकीय परिस्थिती, विरोधकांकडून सरकारवर केली जाणारी टीका, राष्ट्रपती राजवटीची होत असलेली मागणी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मातोश्रीवर गेल्यामुळे सुरू झालेली चर्चा, राहूल गांधी यांनी केलेले वक्तव्य ते परराष्ट्रीय धोरण, चीनकडून सुरू असलेली युध्दाची भाषा अशा सगळ्या विषयांवर संजय राऊत यांनी आपली परखड मत ‘साम' टिव्हीचे संपादक निलेश खरे यांना दिलेल्या मुलाखतीत मांडली. राज्य सरकार विशेषतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सरकार चालवता येत नाही, अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक नाही, यापासून ते सरकारला धोका असल्याच्या सगळ्या वावड्यांवर राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून उत्तम काम करतायेत. मोदींच्या आदेशानूसार वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून कोरोनाची परिस्थिती त्यांनी चांगल्या पध्दतीने हाताळली आहे. गरज पडेल तेव्हा ते बाहेर पडतात, प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतात. अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक नाही हा आरोप देखील चुकीचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना लालफितशाही या शब्दाची प्रंचड चीड होती. १९९५ मध्ये युतीच सरकार सत्तेत होता तेव्हा त्यांनी मला लालफितशाहीचा कारभार दिसला तर मी मंत्रालय गदागदा हालवीन असे विधान केले होते.

पण ब्रिटीशांचा काळापासूनची ही रचना आहे, ती तशीच राहणार आहे. तुम्ही मांड ठोकून कसे बसात यावर सगंळ काही अवलंबून असंत. राज्य चालवतांना अनेकदा अधिकाऱ्यांना जास्तीचे अधिकार देऊन त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागतात. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतले, इकबालसिंग चहल आज चांगल काम करतायेत, महापालिकेत केलेले बदल याचेही परिणाम चागंले दिसत आहेत. महाराष्ट्राला चांगल्या नोकरशाहीची परंपरा आहे, अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्य पुढे गेल्याची अनेक उदाहरणं आहेत.

राहुल गांधी योग्यच बोलले..

कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केलेल्या एका विधानाचा देखील विपर्यास करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. राहुल गांधी याच्यांमध्ये धोरण ठरवण्याची क्षमता आहे. कुठल्याही सरकारमध्ये एका व्यक्तीने निर्णय घेतला पाहिजे, तर सरकार दिशा ठरवू शकते. त्यामुळे आम्हाला निर्णयाचे अधिकार नाहीत, अस जर ते म्हणाले असतील तर ते काही चुकीचे बोलले असे मला वाटत नाही.

महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्याच्या प्रमुखाकडे असतात. महाविकास आघाडीचे सरकार झाले तेव्हा ते सर्वानुमते उध्दव ठाकरे यांना देण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी नाराजीतून बोलले असे नाही, उलट त्यांनी मुख्यमंत्री चांगले काम करत असल्याचे मत व्यक्त केले, याकडेही राऊत यानी लक्ष वेधले. युतीचे सरकार असतांना आम्ही देखील आम्हाला काही अधिकार नाहीत असे बोलायचोच, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com