Congress lost an experienced leader | Sarkarnama

काॅंग्रेसने अनुभवी लोकनेता गमावला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात निलंगेकर सातत्याने सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध राहिले. त्यांमुळेच त्यांच्या दृढ विश्वासाला आकार आला. तरुण वयातच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे लोकांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या कार्याला आकार आला.

दिल्ली ः  तुमच्या वडीलांच्या निधनाने मला अतिव दुःख झाले आहे. काॅंग्रेसचा एकनिष्ठ अनुभवी लोकनेता आज आम्ही गमावला आहे, अशा शब्दांत काॅंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल आपला शोक व्यक्त केला.

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्याच्या खाजगी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. दोन दिवसांपुर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु किडनाचा आजार बळावला आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निलंगेकर यांच्या निधनाने काॅंग्रेसची मोठी हाणी झाल्याच्या भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशोक पाटील निलंगेकर यांना पत्र पाठवून शोक व्यक्त केला आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी शिवाजी पाटील निलंगेकराच्या निधनामुळे काॅंग्रेस एका मोठ्या लोकनेत्याला मुकली असल्याचे म्हटले आहे.

आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात निलंगेकर सातत्याने सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे वचनबद्ध राहिले. त्यांमुळेच त्यांच्या दृढ विश्वासाला आकार आला. तरुण वयातच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे लोकांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या कार्याला आकार आला.

या शिवाय महाराष्ट्रातील सहकार चळवळीत त्यांनी केलेले उल्लेखनीय योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांचा हा वारसा आम्हाला पावलोपावली मार्गदर्शन करत राहील. समाजातील सेवेसाठी  ज्या समर्पित भावनेने त्यांनी गेली कित्येक वर्ष काम केले, ते नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील.  माझे विचार आणि प्रार्थना या कठीण व दुःखद प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत असल्याचेही राहुल गांधी यांनी आपल्या शोक संदेशात नमूद केले आहे.

Edited By: Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख