शिवसैनिकांच्या तक्रारी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना शिवसेना घेरणार..  - complaints of shivsainiks shivsena will surroud former bjp mla narendra mehta | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसैनिकांच्या तक्रारी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना शिवसेना घेरणार.. 

संदीप पंडित
रविवार, 11 जुलै 2021

राज्यात फडणवीस मुख्यमंत्री असताना व शिवसेनेशी युती असतानासुद्धा तत्कालीन भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना त्रास दिला. बाळासाहेबांच्या कलादालनच्या कामास विरोध केला.

विरार : एके काळी नरेंद्र मेहता Narendra Mehta म्हणजे भाजप आणि भाजप BJP म्हणजेच नरेंद्र मेहता, असे समीकरण होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नरेंद्र मेहता यांच्या पुढील अडचणी कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतानाच दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मर्जीतला अध्यक्ष करण्याऐवजी त्यांच्या विरोधातील रवी व्यास यांना भाजपचे अध्यक्ष करून त्यांना एकटे पाडले होते आणि आता शिवसेनेनेही त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. Now shivsena has also started trying to surround him. 

याबाबत शिवसैनिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून नरेंद्र मेहता यांच्या विरोधात तक्रारी केल्या असून एकनाथ शिंदे त्यावर काय कारवाई करतात, यावर मीरा भाईंदरचे राजकारण आता फिरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्यावेळी युतीची सत्ता असल्याने भाजपचे आमदार म्हणून नरेंद्र मेहता यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिल्यावर पण अभय मिळाले होते. परंतु आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने तरी पालकमंत्री मेहतांवरील कारवाईसाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
 

राज्यात फडणवीस मुख्यमंत्री असताना व शिवसेनेशी युती असतानासुद्धा तत्कालीन भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना त्रास दिला. बाळासाहेबांच्या कलादालनच्या कामास विरोध केला. मेट्रो, वरसोवा पूल, घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण, न्यायालय आदी कामही सेनेच्या प्रयत्नांमुळे होत असताना त्याचे श्रेय स्वतःला मिळावे, म्हणून राजकीय अडथळे आणले. दबाव आणून  नगरसेवक-पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला लावला. बांधकाम तोडायला लावले, पालिकेत नगरसेवकांच्या निधी व कामात अडथळे आणले. 

मेहतांनी थेट शिवसेना व ठाकरे घराण्याचे संस्कार काढले व शिवसेना संपवण्याची भाषा केली. मेहतांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांचा ७११ क्लब वादग्रस्त व नियमबाह्य आहे. अपना घर योजनेत गैरप्रकार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहतांची चौकशी सुरू केली आहे. टीडीआर जमीन खरेदीच्या तक्रारी आहेत. तरीसुद्धा सरकार कारवाई करत नसल्याने नागरिक आम्हाला विचारणा करत असल्याची व्यथा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मांडली. इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भेटून व्यथा मांडल्याने आपले नेते व मंत्री ठोस आश्वासन देऊन अधिकाऱ्यांना कार्यवाही साठी सांगतील, अशी अपेक्षा होती. 

हेही वाचा : आमच्याकडे हरामाचा पैसा नाही, पण प्रताप जाधवांच्या संपत्तीची चौकशी ईडीने करावी…

लेखी तक्रारी आणून द्या, त्या पाहून कार्यवाही करू. मेहता जर त्रास देत असेल तर फोन करू का, असे शिंदे यांनी म्हटल्याचेही सूत्रांनी सांगितले. सेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या भेटीला दुजोरा दिला. एकनाथ शिंदे यांना भेटणाऱ्यांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, नगरसेवक जयंतीलाल पाटील, राजू भोईर, दिनेश नलावडे, कमलेश भोईर, शर्माला बगाजी, एलायस बांड्या आदींसह अन्य नगरसेवक, पदाधिकारी यांचा समावेश होता. दुसरीकडे मेहता हे शिंदेच्या भेटीगाठी घेत असल्याची  चर्चा होत असल्याने राज्यात सत्ता येऊन सुद्धा अजून शिवसैनिकांच्या व्यथांची दखल घेतली जाणार नसेल तर न्याय मागायचा तरी कोणा कडे ? अशी खंत एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख