'Bindhasat Bola' is an innovative initiative Is being initiated through NCP Mumbai students Congress | Sarkarnama

विद्यार्थी, पालकांनो 'बिनधास्त बोला'...राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उपक्रम

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 जून 2020

चक्रव्युहात अडकलेला एक विद्यार्थी आणि पालक म्हणून तुम्हाला काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे मत, आक्रोश व असंतोष पत्राव्दारे जाणून घेतला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी कमीत कमी शब्दात किंवा ३० सेकंद ते दोन मिनिटांचा एक व्हिडीओ तयार करून तो राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपर्यंत पोहोच करायचा आहे.

सातारा : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विरोधक क्षुद्र राजकारणापायी परीक्षा घेण्याचा दुराग्रह व अट्टहास कायम ठेवत आहेत. यासंदर्भात चक्रव्युहात अडकलेला विद्यार्थी आणि पालकांचा आवाज पोहोचविण्यासाठी बिनधास्त बोला हा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी मुंबई विद्यार्थी
काँग्रेसच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण यामध्ये विरोधकांनी मात्र, राजकारण आणत परिक्षा घेण्याचा दुराग्रह व अट्टाहास कायम ठेवत आहेत.

त्यामुळे या चक्रव्युहात अडकलेला एक विद्यार्थी आणि पालक म्हणून तुम्हाला काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे मत, आक्रोश व असंतोष पत्राव्दारे जाणून घेतला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी कमीत कमी शब्दात किंवा ३० सेकंद ते दोन मिनिटांचा एक व्हिडीओ तयार करून तो राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपर्यंत पोहोच करायचा आहे.

हे व्हिडीओ एकत्रितपणे विद्यापीठाच्या कुलाधिपतींपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करणार आहेत. तसेच याबाबतची विद्यार्थी व पालकांची भुमिका त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत.  विद्यार्थी व पालकांनी आपले व्हिडीओ २१ जूनपर्यंत  9892411498, 9082072090,  7262883090,9870626465, 9821757668, 8976618004 या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवायचे आहेत. तसेच bolabindas.nsc@gmail.com या ई-मेल आयडी वर मेल करावेत, असे आवाहन मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख