राज कुंद्रा प्रकरणात आशिष शेलार उतरले.. लिहिले अमित शहांना पत्र..

मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात.
राज कुंद्रा प्रकरणात आशिष शेलार उतरले.. लिहिले अमित शहांना पत्र..
Bjp Mla Ahish Shelar wrote letter to Home ministre Amit saha Mumbai

मुंबई ः नुकत्याच अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट, उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणींचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणूकीची धक्कादायक माहिती उघड होते आहे. (Ashish Shelar came down in Raj Kundra case .. wrote a letter to Amit Shah) त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की,  राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे एक अश्लील अ‍ॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवते आहे, असा आरोप करण्यात येतो. (Bjp Mla Ashish Shelar, Mumbai) होतकरू तरुण- तरुणींचे शोषण करून दबाव आणून  हे व्हिडीओ तयार केले गेले होते.  अशा चाळीसहून अधिक बेकायदेशीर अश्लील अँप्स आणि वेबसाइट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. (Central Home Minister Amit Saha) या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोर वयीन मुलांवर विपरीत परिणाम होत असून त्यांना नकारात्मकतेने घेरले आहे.

चाइल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत २०१९ पासून १५ हजार पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या आणि २१३ एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.  सन २०१७ पासून २०१९ पर्यंत पॉस्को प्रकरणात ४५ टक्के वाढ झाली असून ही अत्यंत  चिंताजनक बाब  असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तर मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात  कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात. म्हणून सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अँप्स आणि वेबसाइट्सची झाडाझडती घेण्यात यावी.

तक्रारीसाठी हेल्पलाईन सुरू करावी..

तसेच  पाँर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशा सर्व अँप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत.  नागरिकांना अशा सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाँर्न आणि चाइल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. त्याबाबत माहिती वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात यावी.  

तसेच  सर्व ओटीटी वरील फिल्म, वेबसिरीज  सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा,  गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लीलतेचा व्यापार करणाऱ्या माफियांचे साटेलोटे असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा,अशा मागण्या शेलार यांनी गृहमंत्र्यांकड केल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in