अजित दादा म्हणाले, मी सकाळी ८.३० वाजताच मंत्रालयात येतो... - ajit dada said i come to mantralay at 8.30 am in the morning | Politics Marathi News - Sarkarnama

अजित दादा म्हणाले, मी सकाळी ८.३० वाजताच मंत्रालयात येतो...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 जुलै 2021

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला वस्तू व सेवा कर प्रस्ताव संमत करण्यात आला. केंद्र सरकारकडून जीएसटीचे २० हजार १९३ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे पवार यांनी सभागृहाला सांगितले.

नागपूर : अर्थ खात्याने केंद्र सरकारकडून बंदरासाठी आलेल्या निधीचा वापर केला नसल्याचा आरोप आमदार जयंत पाटील MLA Jayant Patil यांनी केला. अर्थमंत्री अजित पवार Finance Minister Ajit Pawar आमच्या पत्राचे उत्तरही देत नसल्याचा आरोप आमदार पाटील यांनी आज सभागृहात केला. त्यावर असे होऊ शकत नाही, मी सकाळी ८.३० वाजताच मंत्रालयात येतो आणि सर्व कामे करतो, असे अजित दादांनी आमदार पाटलांना सुनावले. i come to mantralay at 8.30 am in the morning

अजित पवार म्हणाले, आपल्याकडून कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. ते मिळाले असते तर तात्काळ संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलावून तुमचा प्रश्‍न निकाली काढला असता. आताही मुख्यमंत्र्यांनी मला सामान्य प्रशासन विभागाची बैठक घ्यायला सांगितले आहे. येथून जाताच ती बैठक घेणार आहे. आपण तेथे या लगेच तुमचा प्रश्‍न निकाली काढू, असे अजित दादांनी आमदार जयंत पाटील यांना सांगितले. आपले काम करताना काम कुणाचे आहे, ते लोक कोणत्या पक्षाचे आहेत, हे मी कधीच पाहत नाही. तर ते काम लवकरात लवकर आणि दर्जेदार झाले पाहिजे, असाच माझा प्रयत्न असतो, असेही अजित दादांनी आमदार पाटलांना सुनावले. 

पावणेचार वाजता सभागृह सुरू झाल्यावर सभापती निंबाळकरांनी दरेकरांचे बोलणे थांबविले. आणि सभापतींच्या दालनात चर्चा झाल्याचे सांगत आता यावर अधिक बोलू नये, असे सांगितले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ केला. सरकारच्या धिक्काराच्या घोषणांना सभागृह दणाणून सोडले आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलेला ठराव संमत केला. 

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत कामकाज थांबवण्याचा प्रयत्न केला. मोठा गोंधळ घालत राज्य सरकारचा धिक्कार केला. अशोक चव्हाण बोलत असताना प्रचंड गोंधळ घातला. परंतु सभापतींनी कामकाज सुरूच ठेवले. चव्हाण यांनी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा देण्याची मागणी केली. ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करून आरक्षण द्यावे, असा ठराव मांडला आणि तो गदारोळातच संमत करण्यात आला. 

हेसुद्धा वाचा  : ‘तो’ मुद्दा आधी संपवायचा आहे, असे म्हणत सभापतींनी पुन्हा तहकूब केले कामकाज… 

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला वस्तू व सेवा कर प्रस्ताव संमत करण्यात आला. केंद्र सरकारकडून जीएसटीचे २० हजार १९३ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे पवार यांनी सभागृहाला सांगितले. दरम्यान बंदरावर मच्छीमारांना होत असलेल्या गुंडांच्या त्रासाला मच्छीमार बांधव वैतागले आहे. यासंदर्भात अजित पवार यांनी मागच्या अधिवेशनात आश्‍वासन दिले होते, पण कार्यवाही काहीच झाली नसल्याचा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून बंदरासाठी निधी मिळवला होता. पण राज्य सरकारने त्याचाही वापर केला नसल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. अधिवेशन संपण्यापूर्वी अर्थखात्याने निर्णय घेण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख