विजेचा "झटका' देणाऱ्या आरोपीला पोलिसांचा झटका

अक्रमच्या अटकेसाठी विशेष पथक तयार केले होते; पण आरोपी अटक टाळण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. अजमेर, गोवा व उज्जैन येथे काही दिवस वास्तव्याला होता.
Crime news - Most Wanted Accused Arrest Mumbai Police News
Crime news - Most Wanted Accused Arrest Mumbai Police News

मुंबईः `थ्री इडियट' चित्रपटामध्ये रॅन्चोने ज्याप्रमाणे दरवाजाला इलेक्‍ट्रिक करंट देऊन स्वतःचा रॅगिंगपासून बचाव केला होता. त्याचप्रमाणे ट्रॉम्बे येथील चिता कॅंप परिसरात सराईत गुन्हेगाराने अटक टाळण्यासाठी दरवाजाच्या लॅचमध्ये हायव्होल्टेज करंट सोडून पोलिसांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या आरोपीला अखेर चार महिन्यांनंतर अटक करण्यात आली. आरोपी अटक टाळण्यासाठी ठिकाणे बदलत होता.

अब्दुल करीम सदाबक्ष शेख ऊर्फ दुबई अक्रम (२७) हा सराईत आरोपी असून, त्याच्याविरोधात मारहाण, धमकावणे, चोरी, लूट असे ३१ गंभीर गुन्हे दाखल होते. आरोपीवर यापूर्वी तडीपारीचीही कारवाई केली आहे. सराईत आरोपी अक्रम नोव्हेंबरमध्ये चिता कॅंप परिसरातील घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

विविध गुन्ह्यांत "वॉन्टेड' असलेला आरोपी आपल्या परिसरात असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले. त्यानंतर अचानक घरी छापा टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, पण याबाबतची माहिती अक्रमला मिळाली. त्याने अटक टाळण्यासाठी घराच्या दरवाजाच्या लॅचमध्ये करंट सोडला.

त्यावेळी अचानक घरात शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका शिपायाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. जसा त्याने लॅचला हात लावला, तसा त्याला जोरदार झटका बसला. तो खाली कोसळल्यानंतर इतर पोलिस अक्रमच्या घरात शिरले, पण अक्रम आधीच तयारीत होता. त्याने चॉपर तयारीत ठेवले होते व घरात शिरलेल्या पोलिसांवर फेकून चाकूने हल्ला केला.

खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर तो छतावर गेला. तेथे छोटी शीट बसवण्यात आली होती. ती उघडून त्याने तेथून पलायन केले. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच भारतीय हत्यार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

अखेर जाळ्यात

अक्रमच्या अटकेसाठी विशेष पथक तयार केले होते; पण आरोपी अटक टाळण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. अजमेर, गोवा व उज्जैन येथे काही दिवस वास्तव्याला होता. तसेच राज्यात नाशिक, ठाणे, जालना, औरंगाबाद, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणीही वास्तव्याला होते. तो नवी मुंबईतील उलवे परिसरात वास्तव्याला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

Edited By :Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com