'ती' सुसाईड नोट बनावट; अज्ञाताविरुद्ध गुन्हा - The fake suicide note that went viral on social media in the name of Vivek Rahade, a student who committed suicide | Politics Marathi News - Sarkarnama

'ती' सुसाईड नोट बनावट; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

सदर चिठ्ठीतील अक्षर विवेक रहाडेचे नसल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या तपासणीत समोर आल्याने या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.  फौजदार सुरेश माळी यांनी फिर्याद दिली सोशल मिडीयावर सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कृत्य केल्याचे म्हटले आहे.

बीड : नीटची परीक्षा दिल्यानंतर पेपर अवघड गेल्याने आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल झालेली ती सुसाईड नोट बनावट असल्याचे समोर आले आहे. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्याचे नसल्याने या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

 बीड तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने बुधवारी (ता. ३०) आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मला वैद्यकीय प्रवेश मिळणार नाही, माझ्या घरच्यांची खासगी महाविद्यालयात शिकवण्याची ऐपत नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे.

मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांची मुलांची किव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल, अशा आशयाची चिठ्ठी सोशल मिडीयावर व्हायरल झाली. यानंतर लोकप्रतिनिधींसह विविध घटकांनी सरकारवर विवेक रहाडे हा राज्य सरकारच्या उदासिन धोरणाचा बळी असल्याच्या टिकेची झोड उठविली. 

मात्र, सदर चिठ्ठीतील अक्षर विवेक रहाडेचे नसल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या तपासणीत समोर आल्याने या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.  फौजदार सुरेश माळी यांनी फिर्याद दिली सोशल मिडीयावर सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कृत्य केल्याचे म्हटले आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख