अजितदादांनी केले आमदार निलेश लंकेंचे कौतूक; चांगल्या कामामुळे त्यांचे नाव भारताबाहेर पोहोचले......

श्री. पवार म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या परिने काम करत असतो. आमदार निलेश लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांसाठी काम सुरू ठेवले असून त्यामध्ये सातत्य ठेवले आहे.
Ajit Pawar praises MLA Nilesh Lanke; Due to his good work, his name reached outside India ...
Ajit Pawar praises MLA Nilesh Lanke; Due to his good work, his name reached outside India ...

सातारा : साताऱ्यातील आमदारातून एखादा निलेश लंके निर्माण होणार का, या प्रश्नावर अजित पवार  (Ajit pawar) यांनी निलेश लंके (Nilesh Lanke)  यांचे तोंडभरून कौतूक केले. ते म्हणाले, पवार साहेब व मी त्यांना नेहमी काळजी घेण्याबाबत सांगत असतो. पण तो काम करत आहे. त्यांचे काम निश्चितच कौतूकास्पद आहे. चांगल्या कामामुळे आता तर त्यांचे नाव भारताच्या बाहेर गेले असून तुमच्याही तोंडून त्यांचेच नाव आले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामांचे कौतूक केले.  Ajit Pawar praises MLA Nilesh Lanka; Due to his good work, his name reached outside India ...

उपमुख्यमंत्री अजित पवार काल (शुक्रवारी) कोरोना आढावा बैठकीसाठी साताऱ्यात आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी साताऱ्यात वाढलेले कोरोना रूग्ण संख्येवरून जिल्ह्यातील आमदार काय काम करतात, याबाबतची विचारणा पत्रकारांनी श्री. पवार यांना केली. यावर साताऱ्यातील आमदारातून एखादा निलेश लंके निर्माण होणार का, असा प्रश्न विचारला.

यावर श्री. पवार म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या परिने काम करत असतो. आमदार निलेश लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांसाठी काम सुरू ठेवले असून त्यामध्ये सातत्य ठेवले आहे. शरद पवार साहेब आणि मी त्यांना काळजी घेण्याबाबत नेहमीच सांगत आलेलो आहे. तरीही ते कोरोना रूग्णांची सेवा करण्याचे काम अविरतपणे करत आहेत.

त्यांचे काम निश्चितच कौतूकास्पद आहे. या कामामुळे त्यांचे नाव भारत देशासह आता देशाबाहेरही गेले आहे. ते चांगले काम करतात म्हणूनच तुम्हीही त्यांचेच नाव घेतले आहे, अशा शब्दात त्यांनी आमदार लंके यांच्या कामाचे कौतूक केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com