वारंवार डिपॉझिट जप्त होऊनही बिचुकलेंची हौस फिटेना - Abhijit Bichukale will contest Pandharpur Assembly by-election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

वारंवार डिपॉझिट जप्त होऊनही बिचुकलेंची हौस फिटेना

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 मार्च 2021

एवढ्यावर न थांबता आता त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते आपला उमेदवारी अर्जही लवकरच भरणार आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना बिचुकले म्हणतात, ''विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. 

सातारा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बिगबॉस फेम अभिजित बिचुकले रिंगणात उतरले आहेत. श्री. बिचुकले यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा तसेच राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणूका लढविल्या आहेत. पण आतापर्यंत त्यांना एकाही निवडणूकीत यश मिळालेले नाही. प्रत्येक वेळी त्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे. तरीही त्यांची निवडणूक लढण्याची हौस फिटलेली नाही. आता ते पंढरपूर पोटनिवडणूकीत काय चमत्कार घडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कधी कधी खासदार उदयनराजे भोसले मिश्किलपणे म्हणतात, ''मी केवळ अभिजित बिचुकलेला घाबरतो.'' त्यामुळेच की काय अभिजितचा आत्मविश्वास वाढतो. ते कोणत्याही निवडणूकीच्या रिंगणात उतरतात आणि दिग्गज उमेदवाराला आव्हान देतात. आतापर्यंत सातारा लोकसभा, विधानसभा, पुणे पदवीधर, विधान परिषदेची पोट निवडणूक, राष्ट्रपती पदाची निवडणूक, वरळी मतदारसंघ या ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केले होते. पण त्यांना यश मिळालेले नाही. मध्यंतरी तर त्यांनी मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, असे आवाहन आघाडी सरकारला केले होते. 

एवढ्यावर न थांबता आता त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते आपला उमेदवारी अर्जही लवकरच भरणार आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना बिचुकले म्हणतात, ''विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. 

काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली. परंतु, त्यावेळी मतदानासाठी गेलेल्या बिचुकलेंचे नावच मतदार यादीत सापडले नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यापूर्वी २०१९ मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. 

राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरची जागा रिक्त झाली होती. आता या मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकदपणाला लावली आहे. 

त्यासाठी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे सुपूत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. दोन मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख