फडणवीस साहेब पुन्हा येण्यासाठी २५ वर्षे वाट पहा

मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
Nawab Malik - Devendra Fadanavis
Nawab Malik - Devendra Fadanavis

मुंबई :  'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 

गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे. आणि फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उध्दव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मॉडेल कायदा आणि सध्याचा कायदा यात बराच फरक आहे परंतु एकतर मोदींना कळत नसेल किंवा कळूनपण लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत आज बोलताना पवारसाहेबांचा उल्लेख केला त्यावर नवाब मलिक यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला. 

सुरुवातीपासून पवारसाहेबांच्या नावांनी स्वतःची केलेली चूक कशी व्यवस्थित आहे हे भाजप जनतेत विषय मांडत आहे. मोदींना आजपर्यंत कळलंच नाही पवारसाहेब या देशातील कृषी सुधार पक्षकार होते तेव्हापण आणि आतापण ते कुठेतरी एकमत तयार करण्याचा प्रयत्न करत होते आणि कृषीमंत्री असताना मॉडेल कायदा तयार करण्याची तयारी होती. आज जे तीन कायदे करण्यात आले. ते तिन्ही कायदे कॉनक्रस लिस्टमध्ये असताना केंद्रसरकारने मॉडेल कायदा केला नाही.राज्यसरकारांचे कायदे स्वतःकडे घेऊन कायदे पारित केले. कायदे जसेच्या तसे लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक आहे. मला वाटतं हाच फरक मोदींना कळत नाही अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com