भाजपची लोकप्रियता संपायला लागली....

भाजपचे काम विरोधाचे आहे कारण ते विरोधक आहेत. त्यामुळे सरकारवर आरोप करणारच यात काहीही आश्चर्य नाही.
BJP's popularity began to wane says MLA prithviraj Chavan
BJP's popularity began to wane says MLA prithviraj Chavan

मुंबई : भाजपची लोकप्रियता संपायला आली आहे, त्यामुळे ते अस्वस्थ झाल्याचे सरळ सरळ दिसत आहे, असा आरोप करून विधानसभेचा अध्यक्ष 
काँग्रेसचाच असणार आहे. मात्र, कोण त्याचे नाव दिल्लीकडूनच कळेल, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. BJP's popularity began to wane says MLA prithviraj Chavan

राज्यात सुरू असलेल्य राजकिय घडामोडी आणि कारखान्यांवर होणारी ईडीची कारवाई यापार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सरकारनामाने संवाद साधला. विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार, या विषयी विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, ते दिल्लीकडून कळवण्यात येईल. मात्र, काँग्रेसकडेच अध्यक्षपद असणार आहे, या संदर्भात चर्चा नसलीत जेव्हा दिल्लीकडून नाव कळेल तेव्हा ते नक्कीच जाहीर होईल.

सहा जुलैला निवडणूक होईल की नंतर होईल, याविषयी विचारले असता ते म्हणाले, याबद्दल अजून माहित नाही. मी काही दिवस बाहेर होतो, त्यामुळे मला याच्या बद्दल काही कल्पना नाही. आमचे प्रभारी आमचे अध्यक्ष ही ज्येष्ठ मंडळी याबाबतचा निर्णय घेणार आहेत, त्याला दिल्लीमधून मान्यता मिळणार आहे. राष्ट्रवादीबाबत मतभेदाविषयी विचारले असता ते म्हणाले, याबद्दल मला कल्पना नाही पण, मतभेद असण्याचं काही कारण नसावे.

भाजपचे काम विरोधाचे आहे कारण ते विरोधक आहेत. त्यामुळे सरकारवर आरोप करणारच यात काहीही आश्चर्य नाही. अधिवेशनाच्या कालावधी हा मुद्दा जो भाजपने पुढे केलाय, या वर ते म्हणाले, कोरोनाची अनोन्य साधारण परिस्थिती आहे. त्याबद्दल कोणालाही निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सुरक्षित वातावरण राहावा म्हणून निर्णय घेतलाय. दिल्लीतील पाहिले तर नरेंद्र मोदी यांनी सहा महिने लोकसभेचे अधिवेशन घेतलं नव्हतं. हा फक्त आमदार किंवा खासदारांचा विषय नाही. तर कर्मचाऱ्यांचाही विषय आहे.

यातून काही सुरक्षित योजना करण्यास कमी पडू का असा ही मोठा विषय असतो. यामध्ये राजकारण आहे की घाबरून अधिवेशन घेतलं जात नाही, हे कारण योग्य नाही. मग खास आरोप नरेंद्र मोदी यांच्यावरही करता येईल आणि सीबीआयकडे हजारो केसेस प्रलंबित आहेत.निश्चितपणे काही अपराध घडला असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तो विषय संपला पाहिजे. म्हणून या संस्थांची निर्मिती केली आहे का, यावर श्री. चव्हाण म्हणाले, लटकून ठेवायचे आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवायची ही प्रवृत्ती अलीकडे बळावली आहे. याचा मी निषेध करतो. 

दोषी असेल किंवा नसेल या निर्णयावर त्यामुळे राजकीय सूड घेतला जातो का, यावर श्री. चव्हाण म्हणाले, असा वास येतोय, मुळात या संस्था निर्माण झाल्या तेव्हा चांगल्या हेतूने स्थापित केल्या होत्या. पण आता तो हेतू साध्य होताना दिसून येत नाही. एखाद्या गोष्टीला हात घातला आणि न थांबता शेवटपर्यंत जाऊन पोहोचलो आणि काहीच सापडलं नाही किंवा एखादा व्यक्ती दोषी आहे. त्याच्यावर खटला दाखल करू असं कधीच दिसून येत नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर हायकोर्टामध्ये तक्रार नोंदवली आहे. आता सगळे थांबलो आणि परत सुरू झालं. त्यामुळे राजकीय सुडाची कारवाई आहे का? यावर श्री. चव्हाण म्हणाले, असे दिसून येते. टांगती तलवार ठेवून लोकांना भयभीत करायचं त्यांना बदनाम करायचं एवढंच काम सुरू आहे.  सध्या चौकशा सुरू आहेत पण निर्णय का लागत नाही. साखर कारखान्यांची चौकशी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना व्हायला पाहिजे होती. 

त्यावेळेस त्यांना काही सापडला नाही किंवा तेही त्याच मार्गाने तेही चालले होते. पण, आता सत्तेत नाही, म्हणून आता ते मागण्या करत आहेत पण आता जनता कंटाळली आहे. राजकीय वापरासाठी संस्थांचा वापर होतो हे जनतेलाही कळलं आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते त्यांनी किती चौकशा केल्या त्याने किती निकाल लावले. आरोप करणे सोपे असतात पण, सत्य कोणीतरी पडताळणी पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

निवडणूक जवळ आली की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी चौकशी लावली जाते का, या विषयी श्री. चव्हाण म्हणाले, निश्चितच सत्ताधाऱ्यांकडे 'मास्टर प्लान' आहे. त्यामुळे विधीमंडळात सरकार प्रश्नाला उत्तर देण्याची परंपरा आहे. त्या त्या खात्याचे मंत्री त्या त्या परीने उत्तर देतील, सगळ्यांनी मिळून काही करायचं असेल तर त्या संदर्भात पार्टी मीटिंग मध्ये चर्चा होईल. भाजपची लोकप्रियता संपायला आली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत हे सरळ सरळ दिसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com