आजचा वाढदिवस : शशिकांत शिंदे  (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस. पक्ष प्रतोद विधान परिषद )  - Today's Birthday: Shashikant Shinde (MLA, NCP. Party Protocol Legislative Council) | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

आजचा वाढदिवस : शशिकांत शिंदे  (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस. पक्ष प्रतोद विधान परिषद ) 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. बारामतीच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा आमदार शशिकांत शिंदे यांनी सुरू केली. 

 शशिकांत शिंदे यांचे मुळगाव जावली तालुक्‍यातील हुमगांव हे असून सध्या ते विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील पक्ष प्रतोद आहेत. कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गावी राहतात. आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचा नेता म्हणून परिचित आहेत.

1999 मध्ये ते प्रथम जावंळीतून राष्ट्रवादीचे आमदार झाले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी 13 वर्षात जलसंपदा मंत्री पदापर्यंत मजल मारली. आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन पंचवार्षिक आमदार, जलसंपदा मंत्री, त्यानंतर विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील पक्ष प्रतोद अशी त्यांची वाटचाल राहिलेली आहे.

राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. बारामतीच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख