आजचा वाढदिवस : रामराजे नाईक निंबाळकर (सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) - Today's birthday: Ramraje Naik Nimbalkar | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : रामराजे नाईक निंबाळकर (सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य)

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ही आहेत.

लटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज म्हणजे रामराजे नाईक  निंबाळकर होय. पुण्यातील गरवारे कॉलेज व फर्ग्युसन  कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातून एमएसस्सी केले. त्यानंतर त्यांनी एलएलएम ही कायद्यातली पदवी मिळविली.

1991 मध्ये ते फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 मध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. राज्यातील अपक्ष 22 आमदारांना एकत्र  करून रामराजेंनी शिवसेनेचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर  जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्याच कालावधीत  मुख्यमंत्री मनोहर जोशी व रामराजेंनी फलटणमध्ये  कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली.

त्यामध्ये  रामराजेंना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष केले. 1999 मध्ये शरद पवार
 यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री  झाले. 2004 मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले. 2013 मध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. 

मतदारसंघांच्या पुनर्रचनेत फलटण मतदारसंघ आरक्षित झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ही आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख